Breaking News

कोपरगाव नगरपालिका अत्यावश्यक सेवा वगळता पुढील चार दिवस बंद

कोपरगाव नगरपालिका अत्यावश्यक सेवा वगळता पुढील चार दिवस बंद


करंजी प्रतिनिधी-
कोपरगाव शहरातील दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत असतांना गेल्या काही दिवसापासून  कोपरगाव नगरपरिषदेत सुध्दा कोरोना ना ने शिरकाव केला  असल्याने दि १ ऑक्टोबर २०२० ते ४ ऑक्टोबर २०२० पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कोपरगाव नगरपरिषद बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
  कोपरगाव शहरातील वाढत्या कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेचे अधिकारी कामगार विविध उपाय योजना करत आहे. तसेच नागरिकांना नियमितपणे विविध सेवा पुरवत आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात विविध कारणामुळे विविध व्यक्तींचा संपर्क येतो त्यातूनच नगरपरिषदेचे काही अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना संसर्ग झाला असून त्यामुळे दिनांक १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२० हे चार दिवस या  नगरपरिषद कार्यालय अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्यात येत आहे.अशी माहिती मुख्यधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.