Breaking News

बाबासाहेब उर्फ बाबा महाराज ढवळे यांचे आपघाती निधन !

बाबासाहेब उर्फ बाबा महाराज ढवळे यांचे आपघाती निधन !


मांडवगण/प्रतिनिधी :
    श्रीगोंदा तालुकायातील  खांडगाव  येथिल  रहीवाशी  बाबासाहेब  रंगनाथ  ढवळे  ऊर्फ  बाबा  महाराज  यांचे  आपघाती निधन झाले. मागील काही  दिवसापूर्वी  मांडवगण श्रीगोंदा रस्त्यावर त्यांच्या  रहत्या घराजवळ दोन मोटारसायकलची धडक होऊन ते  गंभीर जखमी झाले होते. अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार  सुरू असताना  त्यांची  प्राणज्योत  मालवली.
      मृत्यू समयी ते 65  वर्षाचे होते. कै .ढवळे  हे मांदळी  येथिल अत्मागिरी महाराजांचे नीसीम भक्त  होते.  मोरपिसाची टोपी  आणि  भगवा  वेश यामुळे  ते  सर्वत्र  परिचित होते.  परिचित होते. त्यांच्या पश्चात एक भाउ,  बहीणी,पत्नी ,दोन मुले, तीन मुली,  पुतणे , सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते खांडगाव सोसायटीचे माजी  चेअरमन  रामभाऊ  ढवळे यांचे बंधू होते. त्यांच्या पार्थिवावर खांडगाव  येथे अतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय दुःखद अंतःकरणाने उपस्थित होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.