Breaking News

सुजित झावरे पाटील आणि सचिन पाटील वराळ यांना जामीन मंजूर..!

सुजित झावरे पाटील आणि सचिन पाटील वराळ यांना जामीन मंजूर..!
----------------
 दोन्ही वेगळ्या प्रकरणाची अ‍ॅड. महेश तवले यांनी  मांडली बाजू ! 
---------------
अटक पूर्व जामीन मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी समाधान व्यक्त केले !


पारनेर/प्रतिनिधी :
     गेल्या आठवड्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्यावर खंडणी, विनयभंग व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पारनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पठारवाडी येथील किरण उर्फ अक्षय लहू पवार याला ग्रामपंचायत सदस्य सचिन मच्छिंद्र वराळ यांनी दमदाटी केल्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबतची फिर्याद मयतच्या नातेवाईकांनी दिली होती.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील व निघोजचे ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील वराळ यांना जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान सुजित झावरे पाटील हे नगर येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते तर सचिन वराळ पाटील हे फरार होते दोघांनाही अटक पूर्व जामीन मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे.
     या दोन्ही प्रकरणात अ‍ॅड. महेश तवले यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. संकेत ठाणगे यांनी मदत केली.