Breaking News

"परिक्रमा" अभियांत्रिकी महाविद्यालयात जेईई मेन्स परीक्षेचे सुरक्षित व यशस्वी आयोजन !

"परिक्रमा" अभियांत्रिकी महाविद्यालयात जेईई मेन्स परीक्षेचे सुरक्षित व यशस्वी आयोजन


काष्टी प्रतिनिधी :
   श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकूला मधील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये जेईई मेन्स या अभियांत्रिकी पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जेईई या परीक्षेचे दि .०१/०९/२०२० ते ०६/०९/२०२० दरम्यान संपुर्ण भारतभर आयोजन करण्यात आले आहे. परिक्रमा अभियांत्रीकी महाविद्यालय अधिकृत परिक्षा केंद्र असून सुमारे १२०० विद्यार्थी या केंद्रातून जेईई मेन्स या परिक्षेस बसणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त श्री.प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली. मागील वर्षीप्रमाणे यंदाही परिक्रमा अभियांत्रीकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील जेईई मेन्स या परिक्षेसाठी अधिकृत परिक्षा केंद्र आहे. या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर, संगमनेर, राहूरी, जामखेड, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहाता, कर्जत, श्रीगोंदा, नगर इत्यादी ठिकाणावरून विद्यार्थीं परिक्षेसाठी येत आहेत.


      सदर विद्यार्थी व पालकांसाठी पुर्वसुचना दिल्यास रात्री मुक्कामाची सोय संस्थेने उपलब्ध करून दिली असल्याची माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.विजय पाटील यांनी दिली. परिक्षा केंद्राच्या व्यवस्थेविषयी माहिती देताना डॉ.पाटील म्हणाले की राज्य व केंद्र सरकार कोव्हीड १९ च्या पार्श्वभुमीवर दिलेल्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करून परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. फिजिकल डिस्टं सिंग, शरिराचे तापमान मोजणे, गर्दी होऊ न देणे, मास्क उपलब्ध करून देणे, हँड सॅनेटायझर ठिकठिकाणी उपलब्ध करुण या सर्व आवश्यक उपाययोजना संस्थेने केल्या आहेत. तसेच महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरात जंतुनाशकांची तिन वेळा फवारणी करण्यात येते. दुरवरून येणाऱ्या पालकांच्या वाहनांसाठी सुसज्य वाहनतळ व अल्पोपहारगृह देखील नियमांचे पालन करून उपलब्ध करून दिल्याचे डॉ.पाटील यांना सांगितले .
      परिक्षा कक्षा मध्ये सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन वरून दोन विद्यार्थ्यामधील अंतर दोन मिटरपेक्षा जास्त ठेवण्यात आले आहे. मास्क, हॅन्ड ग्लोज सर्वासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच दिवसभरामध्ये एका विद्यार्थ्यासाठी एकच संगणक उपलब्ध करून त्याचे देखील सॅनिटायझेशन करण्यात येत असल्याचे सांगितले.
 
 
 कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाचे सर्व नियम पाळून आरोग्याच्या दृष्टीने सर्व सुरक्षाउपायोजना संस्थेने केल्या आहेत.पालक व विद्यार्थी देखील सर्व सूचनांचे पालन करून अत्यंत चांगले सहकार्य करत आहेत .
-------
प्रतापसिंह बबनराव पाचपुते :- (विश्वस्त परिक्रमा)


 
परिक्रमा कॅम्पसमध्ये जेईई परीक्षेचे अत्यंत सुरक्षित व काटेकोर नियोजन पाहून प्रभावित झालो आहे.
--------
गोविंद बाळासाहेब चेमटे अहमदनगर :- (पालक)

 
परिक्रमा मध्ये परीक्षा देताना उत्तम व्यवस्था व कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळे कुठलेही दडपण आले नाही सुरक्षित परीक्षा केंद्र आहे.
--------
प्रमोद विलास पानसंबळ :- (विद्यार्थी)