Breaking News

जिल्हा परिषदे कडुन नाटेगाव शौचालय घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश !

जिल्हा परिषदे कडुन नाटेगाव शौचालय घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश !
 -----------
गटविकास अधिकारी करणार पारदर्शक चौकशी !


  कोपरगाव तालुका प्रतिनिधी :
     नाटेगाव येथील ग्रामपंचायत माजी सरपंच, उप सरपंच, ग्रामसेवक व विद्यमान सरपंच प्रकल्प अधिकारी यांनी  वैयक्तिक शौचालय बांधकाम करताना संगनमत करून आर्थिक गैर व्यवहार केला  सदर कामाची चौकशी व्हावी म्हणून ग्रामस्थांनी मुख्यमंत्री,उपमुख्य मंत्री व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  यांना अर्ज देऊन इतर तालुक्यातील वरीष्ठ अधिका-यां मार्फत चौकशी   करावी अशी मागणी केली होती माञ वरिष्ठांचा कोणताही लेखी आदेश नसताना कोपरगाव चे तत्कालीन   गटविकास अधिकारी यांनी  चौकशी साठी विस्तार अधिकारी नेमुन चौकशी चालु केली चौकशी पारदर्शक नसल्याची शंका घेत   ही चौकशी थांबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती चाललेली चौकशी थांबवण्यात आली आता जिल्हा परिषदेच्या आदेशा वरुन नवीन गटविकास अधिकाऱ्यां मार्फत  शौचालय घोटाळ्याची चौकशी होणार आसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी सांगितले .
       नाटेगाव येथील ग्रामपंचायतीच्या शौचालयांच्या कामात गैरव्यवहार झाला असुन गेली पाच वर्षापासुन गावात झालेल्या शौचालयांच्या कामांची चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नाटेगाव येथील  ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती  संबंधित लाभार्थींनी ग्रामसेवक व सरपंचांना हाताशी धरून शौचालयाचे अनुदान लाटल्याचा आरोप करून   या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येणार आहे यामध्ये अनेक लाभार्थीनी प्रत्यक्ष शौचालय बांधलेले नाही अनेक लाभार्थीनी जुने शौचालय दाखविलेले, तसेच एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक लाभार्थी ना अनुदान दिले आहे याचीही चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे केली होती   त्या अनुशंगाने ग्रामस्थांच्या या मागणीच्या दैनिक लोकमंथनने वेळोवेळी प्रसिद्धी देत  बातम्या दिल्या होत्या   याची दखल तत्कालीन  गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी घेऊन दि.४ आॕगस्ट पासुन अशा शौचालयांच्या चौकशी साठी पंचायत समितीचे विस्तार अधीकारी डी.ओ.रानमाळ व वाघमोडे बी.बी. विस्तार अधिकारी यांच्या मार्फत चौकशी सुरू केली माञ सर्व मुद्द्यावर आधारे सर्वे होणे अपेक्षित होते   केवळ आहे ते शौचालयाची पाहणी करत असल्याचे निर्दशनात येताच हा केवळ चौकशी चा फार्स आहे व कोपरगाव पंचायत समितीच्या  गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी  करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली नव्हती  असे   सांगत ग्रामस्थांनी ही चौकशी बंद करा अशी लेखी मागणी केली चौकशी   बंद करण्यात आली ग्रामस्थांनी परत जिल्हा परिषदे कडे पाठपुरावा केला .  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी कोपरगाव पंचायत समितीस नव्याने बदली होऊन आलेले गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना दिनांक २ सप्टेंबर रोजी लेखी आदेश देऊन नाटेगाव येथिल शौचालय घोटाळ्याची स्वतः चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहीती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर  यांनी दिली आहे. आता कोपरगाव चे नविन आलेले गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या  चौकशी  कडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहे. " जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने नाटेगाव येथिल शौचालयांची चौकशी मी स्वतः च करणार आहे माञ सध्या कोविड आजाराच्या तालुक्याच्या काही जबाबदाऱ्या  व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पहाणी चालु आहे तरीही ह्याच आठवड्यात नाटेगाव ची अर्जदारांच्या समक्ष  पारदर्शक चौकशी करणार असल्याचे कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी सांगितले