Breaking News

कोरोना काळात धाडसी चोरी, प्रशासन हतबल !

कोरोना काळात धाडसी चोरी, प्रशासन हतबल


राहाता प्रतिनिधी :
  राहाता शहराचे ग्रामदैवत असलेल्या विरभद्र महाराज मंदिरात धाडसी दरोड्याची घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. दोन अज्ञात चोरटे मंदिर परिसरात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.विरभद्र महाराजांचा चांदीच्या मुकूटासह अनेक आभुषणे असा सुमारे चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहाता येथील विरभद्र महाराज मंदिर बंद आहे.

       मंदिरातील पुजारी केवळ दैनदिन पूजा करतात. मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास दोन चोरट्यांनी भिंतीवरून उडी मारून प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. विरभद्र मंदिराच्या गाभाऱ्यात घूसून चोरट्यांनी चांदीचा मुकुट चोरला तर मंदिराच्या आतील शंकर पार्वतीच्या मूर्तीवरील मुकुटही चोरट्यांनी लांबवला. अतिरिक्त पोलिस अधिक्षक दिपाली काळे, शिर्डीचे विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे हे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. श्वानपथकाने मंदिरापासून मागच्या बाजूने 2 किलोमीटरपर्यत चोरट्यांचा माग काढला आहे. अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री भोये करत आहे.