Breaking News

नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील सोमवारी पदभार स्वीकारणार !

नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील सोमवारी पदभार स्वीकारणार !


अहमदनगर/प्रतिनिधी :
     नवे पोलिस अधीक्षक मनोज पाटील येत्या सोमवारी 21 सप्टेंबरला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान विद्यमान पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या बदलीचे ठिकाण शासनाच्या बदली आदेशात निर्देशित केलेले नाही. त्यामुळे त्यांना नव्या ठिकाणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवे पोलीस अधीक्षक मनोज पाटील मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कौलगे येथील रहिवासी आहेत. कोल्हापूर सातारा पुणे ठाणे आणि सोलापूर येथे उपअधीक्षक आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक या पदांवर त्यांनी काम केले आहे. नगर जिल्ह्यात काम करण्याची त्यांची पहिलीच संधी आहे.