Breaking News

सुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल !

सुजित झावरे यांच्या वर विनयभंग व खंडणी प्रकरणी ज्योती देवरे यांनी केला गुन्हा दाखल
-------------
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर गुन्हा दाखल !

पारनेर प्रतिनिधी-
      जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना त्यांच्या स्टाफ समोर अपमानास्पद वागणूक दिली तसेच काही दिवसांपूर्वी मोबाईलवरून असशील भाषेमध्ये शिवीगाळ करून महिला अधिकारी चे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला तसेच वेळोवेळी पैशाची मागणी केली यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
      याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 17 रोजी सकाळी अकराच्या सुमारास सुजित झावरे हे तहसील कार्यालयामध्ये आले तेथे येऊन त्यांनी तहसीलदार यांच्या दालनामध्ये विनापरवाना अचानक प्रवेश करून मोठमोठ्याने आरडाओरडा करून बिनबुडाचे आरोप केले कार्यालयीन स्टाफ ची मिटिंग चालू असताना त्यांच्यासमोर माझा अपमान केला केवळ पाच व्यक्ती निवेदन द्यायला या असे सांगूनही सुजित झावरे यांनी त्यांच्या बरोबर आलेल्या लोकांना तुम्ही सगळे आहात यारे बघू काय होते ते म्हणून खुशाल आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही कोणाला घाबरत नाही त्यावेळी मी त्यांना जाणीव करून दिली की आपण यापूर्वीही मला फोनवरून अश्लील शिवीगाळ करून मला लज्जा निर्माण होईल असे बोलले आहात मला सर्वांसमोर त्याची आठवण करुन देण्यास भाग पाडू नये तसेच जिल्हाधिकारी यांचे कलम 144 आदेश आहेत कृपया प्रशासनाला सहकार्य करा व पाचपेक्षा जास्त व्यक्ती दालनात आणून माझ्या समोर गोंधळ घालू नका सामाजिक अंतर पाळा कोरोना ची साथ सुरू आहे त्यावर सुजित झावरे म्हणाले की तहसील कार्यालय व दालन आमचे आहे तुमचे नाही आम्ही वाटेल ते करू म्हणून जोरात हातवारे करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला व सर्व जमाव एकत्र करून मी महिला अधिकारी असल्याने माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला माझ्या कार्यकारी दंडाधिकारी पदाचा अपमान झाला मी त्यांना समजावून सांगितले की मी कार्यकारी दंडाधिकारी आहे माझा अपमान करू नका त्यावर ते म्हणाले की तुम्ही आमचे काही करू शकत नाही आम्ही तुमचा आदेश जुमानणार नाहीत मला पुन्हा त्यांनी धमकावून दबाव आणला मला माझी महत्त्वाची मीटिंग बरखास्त करावी लागली तर मला माझ्या स्टॉप समोर अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले तसेच दि 14 ऑगस्ट रोजी रात्री 09:48 वाजता सुजित झावरे यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला फोन करून असशील भाषेत लज्जा उत्पन्न होईल असे बोलले मी महिला अधिकारी असल्याने माझे मनोधैर्य खच्चीकरण केले तसेच मागील चार ते पाच महिन्यापासून झावरे यांनी मला महिन्याला पन्नास हजार रुपये देत जा जर नाही दिले तर तुमची तक्रार मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे करेल परंतु मी त्यांना एकदाही काही रुपये दिले नाही माझी आई जिल्हा परिषद सदस्य आहे व मी तुमच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार द्यायला लावेल अशी धमकी दिली होती तरीही मी झावरे यांच्या धमकीला जुमानले नाही त्यांना कधीही पैसे दिले नाही
सुजित झावरे यांनी आमच्या शासकीय कामात अडथळा केला व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून लोकांना चिथावणी देऊन तहसीलदार कार्यालयाचे दालनात गर्दी केली व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे उल्लंघन केले तसेच साथरोग प्रतिबंध कायदा 1997 चे उल्लंघन केले आम्ही आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा इंडस्ट्रियल कमांडर या महिला असल्याचे आमच्या आदेश पाळले नाहीत आमच्यावर दबाव आणून आमचे वर दमदाटी केली अश्लील आरोप व शिवीगाळ करून मानभंग केला सर्वांसमोर लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले तसेच महिन्याला पैशाची मागणी केली म्हणून त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
यानुसार पारनेर पोलीस स्टेशन मध्ये सुजित झावरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.