Breaking News

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढळगाव मध्ये शुभारंभ !

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढळगाव मध्ये शुभारंभ !
--------
प्रत्येकाने स्वताची व कुटुंबाची काळजी घ्यावी-गटविकास अधिकारी काळे


श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी
राज्य सरकारने कोरोनाच्या लढ्यात महत्त्वाचे पाऊल टाकले असून आता होम टु होम आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे त्यानुसार दि १५ सप्टेंबर पासुन माझे घर माझे कुटुंब ही मोहीम सुरू होणार असून या मोहिमेचा आज आढळगाव मध्ये शुभारंभ करण्यात आला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरु केली असुन१५सप्टेंबर पासून ही मोहीम राज्यभरात सुरू केली आहे यात कोरोना दुतांच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे या तपासणीत जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसून आली तर त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले जाणार आहेत


या मोहिमेत स्थानिक सामाजिक संस्था.स्वयंसेवी संस्था स्थानिक पदाधिकारी आदींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे
आज आढळगाव मध्ये या मोहिमेचा शुभारंभ गटविकास अधिकारी प्रशांत काळे.सहाय्यक गटविकास अधिकारी राम जगताप.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर.अनिल टवाळ.पत्रकार अमोल गव्हाणे.रुग्ण कल्याण समिती सदस्य अमर छतिसे.शरद शिंदे . बापुराव जाधव.संतोष सोनवणे आदींच्या उपस्थितीत झाला
या मोहिमे बाबत मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत शेळके यांनी केले तर आभार डॉ.पठारे यांनी मानले

प्रत्येकाने स्वताची व कुटुंबाची काळजी घ्यावी-काळे 
या विषाणुचा सामना करताना प्रत्येकाने स्वताची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे सार्वजनिक ठिकाणी जास्त गर्दी च्या ठिकाणी जाणे टाळावे.जरी कामानिमित्त गेले तर तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधावा असे गटविकास अधिकारी प्रशांत काळे म्हणाले.