Breaking News

भारजवाडी ते भगवाननगर रस्त्याची दुरावस्था !

भारजवाडी ते भगवाननगर रस्त्याची दुरावस्था !


खरवंडी कासार/प्रतिनिधी
      भारजवाडी ते भगवान नगर या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे हे रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे आहेत. रस्त्यातून जाताना लहान मुले, महिलांना  नदीच्या पत्रातून कंबरा इतक्या पाण्यातून जावे लागत आहे, नागरिकांना दैनंदिन गरज भागवण्यासाठी या रस्त्याची पायपिट करताना मोठी कसरत करावी लागत असून, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे , मागील सरपंचांना रस्त्याची कहाणी सागुंही त्यांनी लक्ष दिले नाही त्यामुळे आमच्यावर हे दिवस आले आहेत परंतू आतातरी प्रशासनाने मुरूम तरी टाकून द्यावा,  आजारी रुग्णांना, म्हाताऱ्या माणसाला दवाखान्यात नेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत, रस्ता दुरूस्त नाही केला तर आम्ही आता उपोषणाला बसणार आहोत असा इशारा  येथील नागरिक आश्रु बटुळे, भास्कर बटुळे, भागवत बटूळे, उद्धव बटुळे, वैजीनाथ बटुळे, राजू बटुळे, मारुती बटूळे, भगवाननगर  येथील नागरिकांनी दिला आहे.