Breaking News

मुळा धरणाच्या सांडव्याजवळ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने युवक बचावला !

मुळा धरणाच्या सांडव्याजवळ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने युवक बचावला !
-----------
 वरिष्ठअधिकारी मात्र धरणाच्या व्ही आय पी गेस्ट हाऊस वरच !
----------


राहुरी शहर प्रतिनिधी :
       नगर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमतेच्या मुळा धरणातून आज सकाळी जायकवाडी कडे दहा वाजता अकरा दरवाज्यातून २ हजार क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग करण्यात आला . यावेळी सतर्कतेचा भोंगा ही वाजवण्यात आला . दरम्यानच्या काळात मासेमारी करणाऱ्या करण बर्डे हा युवक गोंधळुन गेल्याने सांडव्याजवळ  एका ठिकाणी अडकला . यावेळी आजूबाजूच्या तरुणांच्या व जलसंपदा विभागाच्या स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या तरुणात वाचवण्यात यश मिळाले आहे . तरुण अडकल्याचे कळताच जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या  समवेत असलेले  उपअभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी तात्काळ  कर्मचारी भाऊसाहेब कोळेकर यांना घेऊन भिंतीवरील धरणाच्या दरवाज्याचे तीन गेट तात्काळ बंद केले . काही तरुणांनी सांडव्यावरील तरुणाला धीर दिला . धरणाच्या सांडव्यातील पाणी काहीसे उतरताच  कर्मचाऱ्यांनी या युवकास ताब्यात घेतले , त्याची चौकशी स्थानिक अधिकाऱ्यांनी केली असता तो पाण्याच्या प्रवाहाने भांभावल्याने हा प्रकार घडला हे सांगितले . 
         मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने पर्यटकांचा ओघ कुटुंबीयांसह वाढला असून कोरोना महामारी च्या प्रादुर्भावामुळे या परिसरात बंदी घालण्यात आली आहे . नुकतीच कार्यकारी अभियंता यांची बदली झाली असल्याने नवीन व प्रभारी अधिकारी काम पहात आहेत . धरणाचा अवाका मोठा आहे  , स्थानिक अधिकारी लक्ष देऊन आहेत , मात्र काही वरिष्ठ अधिकारी धरणाकडे चक्कर मारून मग नगर येथून सूत्र हलवीत असल्याने या अधिकाऱ्यांना जाब कोण विचारणार ? असा प्रश्न विचारला जात आहे . 
 धरण परिसरात जलसंपदा विभाग व पोलीस यांचा बंदोबस्त असूनही हौशी पर्यटकांनी मात्र परिसर फुलून गेला आहे . असे असले तरी नगरचे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी  धरण परिसरात असणाऱ्या त्रुटी उघड होऊ नये म्हणून पर्यटकांना अटकाव करण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर  पर्यटकांना पाणी सोडल्याने परिसर खुणावत आहे .