Breaking News

मुळा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला, ४ हजार क्यूसेकने जायकवाडीकडे झेपावले पाणी !


मुळा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला, ४ हजार क्यूसेकने जायकवाडीकडे झेपावले पाणी !


राहुरी शहर प्रतिनिधी :
    मुळा धरणातून आज दुपारी नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळी अडीच हजार क्यूसेक ने होणारा  विसर्ग दुपारी वाढवून  धरणाच्या ११ दरवाज्यातून ४ हजार  क्यूसेकने विसर्ग सुरू आहे . 
मुळा धरणाच्या जवळच्या क्षेत्रामध्ये पारनेर व कोतुळ कडील भागात पाऊस झाल्याने आवक वाढली आहे  . त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी झेपावत आहे . सध्या मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून वीजनिर्मितीसाठी 550 क्यूसेक ने पाणी सोडले आहे ,  तर डाव्या कालव्यातून शंभर क्यूसेक ने पाणी सोडलेले आहे .  जलसंपदा विभागाकडून मुळा धरण येथे तर सहा तासाला पाणीपातळी घेतली जात आहे . विभागाचे अधिकारी ,कर्मचारी पाणीपातळी कडे लक्ष देऊन आहेत.
कोरोना महामारी च्या प्रादुर्भावाच्या ार्श्‍वभूमीवर मुळा धरण परिसरात संचारबंदी लागू आहे . धरणावर बंदोबस्त असला तरी हौशी पर्यटक मात्र दुरूनच धरणाच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेताना दिसत आहे .