Breaking News

जामखेडच्या खाकीने जपली सामाजिक बांधिलकी

जामखेडच्या खाकीने जपली सामाजिक बांधिलकी


जामखेड प्रतिनिधी 
 कोरोना पॉझिटिव्ह लोकांसाठी वरदान ठरलेल्या आरोळे हॉस्पिटलच्या कोवीड सेंटरला जामखेड पोलिस स्टेशनच्या आधिकारी व कर्मचारीवर्गाकडुन सामाजिक बांधिलकीतुन पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या हस्ते ५१ हजार रुपयांची मदत रवि आरोळे यांच्याकडे सुपूर्द केली आहे .गेल्या सहा महिन्यांपासून     जामखेडसह शेजारील तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सेवेत आहोरात्र आरोळे हॉस्पिटल झटत आहे. रूग्णांचे राहणे ,जेवण, इतर औषधे असे आजपर्यंत मोफत उपचार केलेले आहेत. सामाजिक बांधिलकीतुन पोलिसांनी दिलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.