Breaking News

सुपा नविन औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिकांना डावले जात असल्याच्या निषेधार्थ भुमिपुत्रांचा आंदोलनाचा इशारा !

सुपा नविन औद्योगिक वसाहतीमध्ये  स्थानिकांना डावले जात असल्याच्या निषेधार्थ भुमिपुत्रांचा आंदोलनाचा इशारा !


 सुपा प्रतिनिधी :
     पारनेर तालुक्यातील सुपा येथील म्हसणे फाटा नविन औद्योगिक वसाहतीत स्थानिक भुमिपुत्रांना कंपन्यांनी डावले जात आसल्याच्या निषेधार्थ आपधुपचे युवक सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२० रोजी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 
   याबाबत आपधुप येथील युवकांनी जिल्हाधिकारी, जेष्ठ समाजसेवक  अण्णासाहेब हजारे, व औद्योगिक महामंडळाच्या आधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा  म्हसणे फाटा औद्योगिक वसाहतीमध्ये जपानी  उद्योगासाठी  जमीन आधिग्रहण करण्यात येत होत्या तेंव्हा  आपधुप ग्रामस्थांनी जमीनी न देण्याचा निर्णय  घेतला होता  व तसा विरोध ही केला होता.परंतु तात्कालीन प्रांत अधिकारी  व औद्योगिक वसहतीच्या अधिकार्यांनी शब्द दिला की ज्या कुटुबाच्या जमीनी जातील त्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीमध्ये कायमस्वरुपी घेण्यात येईल व आपधुप शिवारात जेवढ्या कपंन्या झाल्या आहे त्या मध्ये आपधुप येथील तरुणांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते तरी आज रोजी " यु,नो,मिंण्डा "ही कंपनी आपधुप शिवारात चालू झाली असून त्यामध्ये स्थानिकांना कोणतेही स्थान दिले जात नसून व वेळोवेळी कंपनीचे एच,आर  उल्हास नेवाळे यांची २५ ते ३० वेळा भेट घेतली असता फक्त आश्वासनच दिले गेली .कुठल्याही प्रकारची कामे दिली गेली नाही. त्यामुळे जमीनी देऊन येथील शेतकरी भुमीहीन झाला असताना युवकांनाही काही काम नसल्याने  गावातील तरुण बेरोजगार झाले आहेत. 
      गावातील तरुणांनी एकत्र येऊन  कंपनी अधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.  यावेळी आपधुप तंटामुक्तीचे अध्यक्ष  संतोष भगवंत गवळी, पुष्पराज किसन गवळी, शरद गवळी, गणेश गवळी, गौरव गवळी, आर्जुन चव्हान, निलेश गवळी, किशोर गवळी, बाप्पू गवळी, दिपक गवळी, पोपट चव्हाण, सुरज गावडे, सागर गवळी, शरद पवार उपस्थित उपस्थित होते.  आपधुपच्या युवकांनी आपल्या निवेदनाच्या प्रती जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, जिल्हाधिकारी अहमदनगर, प्रांत अधिकारी अहमदनगर, एम आय डी सी कार्यालय अहमदनगर, तहसिलदार पारनेर व सुपा पोलिस स्टेशनला दिल्या आहेत.