Breaking News

पत्रकार पांडूरंग रायकर यांचा आरोग्य सुविधा अभावी मृत्यू संबंधितांवर कारवाई व्हावी !

पत्रकार पांडूरंग रायकर यांचा आरोग्य सुविधा अभावी मृत्यू संबंधितांवर कारवाई व्हावी !जामखेड प्रतिनिधी :
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोग्य यंत्रणेतील अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच सर्व शासकीय रुग्णालयात पत्रकारांसाठी बेड राखीव असावेत अशा मागण्या जामखेड तालुक्यातील सर्व 
 पत्रकारांच्या वतीने शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पत्रकार पांडुरंग रायकर यांना आरोग्य सुविधा देण्यात हाँस्पीटल प्रशासन व संबधित प्रशासकीय यंत्रणांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे स्पष्ट होत आहे.पांडूरंग यांना रूग्णवाहिका, व्हेंटीलेटर वेळेत मिळण्यासाठी पूण्यातील अनेक पत्रकारांनी संबंधितांना फोनद्वारे विनंत्या केल्या होत्या . तरी त्या वेळेत न मिळाल्याने प्रकृती खालावत गेली व पांडूरंग यांचा  आरोग्य सुविधांआभावी मृत्यू झाला. या आभावास जवाबदार हाँस्पीटल व प्रशासनातील अधिकारयांवर कडक कारवाई करावी. सर्व शासकीय रुग्णालयात पत्रकारांसाठी बेड राखीव असावेत अशी मागणी करण्यात आली. तहसिलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले. 
 यावेळी पत्रकार नासीर पठाण,  अशोक निमोणकर, मिठूलाल नवलाखा, यासीन शेख, संजय वारभोग सुदाम वराट उपस्थित होते.