Breaking News

तहसीलदार यांना स क्ष म संघटना चे निवेदन !

तहसीलदार यांना स क्ष म संघटना चे निवेदन


राहता/प्रतिनिधी :
     राहाता तहसीलदार याना स क्ष म संघटना तर्फे निवेदन देण्यात आले आहे त्यात म्हटले आहे की भारताचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी साहेब यांनी घोषणा केल्याप्रमाणे प्रत्येक राज्यातील दिव्यांग बंधू-भगिनींना अंतोदय शिधा पत्रिका योजनेत समाविष्ट करण्याचा आदेश दिला गेला असून त्याचे त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, प्रशासकीय आदेश काढला आहे तरी आपल्या राहता तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींना त्वरित अंत्योदय शिधापत्रिका देण्यात यावी अशी नम्र विनंती व सक्षम संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे त्याचप्रमाणे उज्वला गॅस योजने प्रमाणे अंध व दृष्टी बाधित व्यक्तींना देखील गॅस सिलेंडर विनामूल्य देण्याचा फायदा मिळावा अशी विनंती ती एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी श्रीकांत साळुंखे अध्यक्ष स क्ष म संघटना ,भास्कर जाधव उपाध्यक्ष ,गोरखनाथ काटे सचिव ,अनिल धुमणे सहसचिव,भाऊसाहेब सदाफळ कार्यकारणी सदस्य, संतोष निकम मानसं अध्यक्ष ,भास्कर कुंभारडे, राजेंद्र गोदकर,योगेश गोदकर,बाळासाहेब चौधरी, सचिन पोटे,मुन्नाभाई शेख,महेश लांडे,संध्या भोसले बाळासाहेब संत,जया शिंदे,उजवला निकम आदी यावेळी उपस्थित होते.