Breaking News

सुशांत ड्रग्ज घेत होता, त्याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होते!

सारा अली खानची धक्कादायक कबुलीमुंबई/ प्रतिनिधी 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची लफडेखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सुशांत ड्रग्ज घ्यायचा, आणि आपण त्याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये राहिलो होतो, असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री सारा अली खान हिने एनसीबीच्या चौकशी दरम्यान केला. मात्र, मी ड्रग्ज घेतलेले नाही, असेही तिने सांगितले.

बॉलिवूडमधील ड्रग्ज सेवन प्रकरणात अनेक सनसनाटी खुलासे आतापर्यंत झाले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्यासह 16 जणांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांचीही नावे समोर आली होती. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाने समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. शनिवारी एनसीबीकडून दीपिका, सारा आणि श्रद्धा यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, एनसीबीच्या सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाने चौकशीत ड्रग्ज चॅट केल्याचे कबूल केले आहे. दीपिक काही प्रश्‍नांची उत्तरे समाधानकारक देत नसल्याचेही समोर आले आहे. 

दीपिकाची साडेपाच तास चौकशी

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची करण्यात आलेल्या साडेपाच तासाच्या चौकशीत दीपिकाने ड्रग्ज चॅट केल्याची कबुली दिली आहे. मात्र तिने ड्रग्ज सेवन केल्याचे अमान्य केले. दीपिकापाठोपाठ सारानेही ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे स्पष्ट केले. दीपिकाची मॅनेजर करिश्माला दीपिकासमोर बसवून तिच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. यावेळी तिच्याकडून एनसीबीने फोनही काढून घेतला होता. तब्बल साडेपाच तासाच्या प्रश्‍नांच्या सरबत्तीनंतर दीपिकाची चौकशी संपली.