Breaking News

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात ४० अहवाल पॉझिटिव.

पारनेर तालुक्यात आज दिवसभरात ४० अहवाल पॉझिटिव.
---------------
रुग्ण संख्या वाढत असताना तालुक्यातील नागरिक मात्र बिंदास.


पारनेर प्रतिनिधी-
     पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे समूह संसर्ग झाला असण्याची शक्यता तालुक्यात वर्तवली जात आहे,तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ही १२०० जवळ पोहोचली आहे आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार ४० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हत्तलखिंडी १ वडझिरे २ पिंपळगाव रोठा २ जवळा ३ भाळवणी १० देवी भोयरे १ आळकुटी १ कोहकडी १ राळेगण थेरपाळ १ निघोज १ टाकळी ढोकेश्वर २ पारनेर ६ शहापूर १ कासारे १ कार्जुले हर्या १ गोरेगाव १ हिवरे कोरडे ३ सुपा १ यादववाडी १ या गावांमध्ये व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
       तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत,अनेक भागांमध्ये समूह संसर्ग झाला असताना देखील तेथील नागरिक गांभीर्याने घेत नाहीत. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे.