Breaking News

चांदेकसारे परिसरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सभापती जगधने यांच्या कडून पहाणी !

चांदेकसारे परिसरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सभापती जगधने यांच्या कडून पहाणी !
------
आ आशुतोष काळे यांच्या कडून महसूल व कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश 


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
      गुरुवारी चांदेकसारे परिसरात झालेल्या अतिवृष्टीने व सोनेवाडी नगदवाडी परिसरातून पावसाचे वाहून आलेले पाणी चांदेकसारे गावात शिरल्यामुळे अनेक घरे पाण्यात गेली होती. नुसकानीची पाहणी काल पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने यांनी  केली.झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांनी आ. आशुतोष काळे यांना दिल्यानंतर काळे यांनी तात्काळ महसूल व कृषी विभागाला सदर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
     गुरुवारी तब्बल तीन तास पाऊस झाल्यामुळे चांदेकसारे येथील संगमनेर कोपरगाव रोड लगत असलेले घरे पाण्याखाली गेली त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले.रोड लगत असलेले किराणा दुकाने ,कांद्याची चाळ व जनावरांसाठी भरलेला मुरघास ह्या पावसात पुर्ण ओला झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. माजी सभापती अनुसयाताई होन यांनी ही माहिती तात्काळ आ. आशुतोष काळे यांना कळविल्यानंतर लगेचच पंचायत समिती ची टीम सोबत घेत सभापती पौर्णिमाताई जगधने यांनी चांदेकसारे परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, रोहिदास होन, डॉ गोरक्षनाथ रोकडे, पोलीस पाटील मीराताई रोकडे,सरपंच सौ पूनम खरात, राहुल जगधणे, दगुभाऊ होन, शंकरराव चव्हाण, सुनील खरात, तलाठी दत्तात्रय बिन्नर, ग्रामसेवक प्रल्हाद सुकेकर आदी उपस्थित होते.यावेळी माजी सभापती अनुसयाताई होन यांनी ज्या कुटुंबाची नुसकान झाली त्या कुटुंबांना आधार देत सर्वांचे पंचनामे होतील व प्रशासनाकडुन  आलेली मदत आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल असे सांगितले. तर पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमाताई जगधने यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार चांदेकसारे परिसरातील कोणतेही बाधीत कुटुंब पंचनामे करण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता कामगार तलाठी दत्तात्रय बिन्नर व ग्रामसेवक प्रल्हाद सुकेकर यांना घेण्याची सुचना केली.गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे सरपंच पुनमताई खरात व पोलीस पाटील मीराताई रोकडे यांचीही घरे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे त्यांनाही या पावसाचा फटका बसला आहे.सरपंच पुनम खरात यांनी  ज्यांची नुसकान झाली त्यांनी तात्काळ ग्रामपंचायतीला माहिती देऊन रीतसर पंचनामे करून घ्यावे असे आवाहन केले.