Breaking News

मुंबादेवी तरुण मंडळाकडून औषध फवारणी !

मुंबादेवी तरुण मंडळाकडून औषध फवारणीकरंजी प्रतिनिधी-
    कोपरगाव शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे ही संख्या आता हजारी पार गेल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण पसरले असतांना शहरातील विविध सामाजिक संस्था आपल्या माध्यमातून समाज कार्य करत आहे.
    कोपरगाव प्रशासन देखील कोरोना ची वाढती साखळी तोडण्यासाठी जोमाने प्रयत्न करतांना दिसून येत आहे त्यांचा सोबतीला  कोपरगाव शहरातील विविध सामाजिक संस्था देखील मदत कार्य करत आहे याचं अनुषंगाने आज रविवार  प्रभाग क्रमांक ५ मधील कापडबाजर शिवाजी रोड पांडे गल्ली ब्राह्मण गल्ली जिजामाता उद्यान या भागात देखील कोरोना रुग्ण संख्या वाढतांना दिसत आहे याच अनुषंगाने आज मुंबादेवी तरुण मंडळा व साई गाव पालखी या मंडळाने स्वखर्चाने औषध  फवारणी करत एक अगळीवेगळी समाजसेवा तरुणांकडून घाडुन आणली आहे
     या समाजकार्यात मुंबादेवी तरुण  मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड,  संतोष चव्हाण, संतोष चव्हाण संदीप दळवी, संजय जगताप,  सुनील खैरे मनोज कपोते अरविंद मंडलिक विवेक फंड,  गोपाल वैरागळ, राहुल पांडे कृष्णा दळवी,  गोलू छाजेड,  समाधान कंदे, मोनू दळवी,  विशाल वाघ, विनायक खडागळे,  अमोल देवकर,  मयूर दळवी, बंटी दळवी, किरण सूर्यवंशी किरण सूर्यवंशी जुबेद आत्तार,  हुजेब  आतार, गोविंद विसपुते,  अक्षय काळे, अक्षय भडकवाडे, ओम कपोते, विजय उदावंत नंदकिशोर जाधव आदी मंडळाचे सभासद एकत्र येत आज दिवसभर घरोघर गल्ली बोळात सॅनिटायझर फवारणी करत कोरोना आजाराविषयी जनजागृती करत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत होते.
    सुनील फंड यांच्या मुबादेवी तरुण मंडळाने कोरोना लोकडाऊन काळात आपल्या माध्यमातून शहरातील अनिवासी अनाथ लोकांना जेवणाचे डब्बे देखील पुरवले आहे.