Breaking News

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण !

 

नागपूर । राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अगदी सर्वसामान्यांपासून तर राजकीय नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण होण्याचं सत्र सुरूच आहे. नुकतेचं राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नितीन राऊत यांनी याबाबतची माहिती स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. गेल्या आठवड्यात राऊत यांनी मुंबईत कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.

राऊत यांनी पुन्हा कोरोना चाचणी केल्यावर आज त्यांच्या अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोना चाचणी करण्याचे आवाहन राऊत यांनी केले आहे. राऊत यांच्यापुर्वी नागपूर जिल्ह्यातील राज्यसरकारचे मंत्री सुनील केदार यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नागपुरातील भाजपचे आमदार गिरीश व्यास व प्रवीण दटके यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी सुनील केदार व गिरीश व्यास हे कोरोना मुक्त झाले आहे.