Breaking News

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन ! सातारा । ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज निधन झाले असून, साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. 'आई माझी काळूबाई' या सिरियलचे शुटिंग सुरू असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आशालता वाबगावकर यांच्यासह इतर 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. गेल्या चार दिवसांपासून आशालता वाबगावकर यांच्यावर साताऱ्यात उपचार सुरू होते. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर आज पहाटे त्यांची अखेरचा श्वास घेतला. त्यांनी रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांसह नाट्यसंगीतामधूनही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.