Breaking News

नरेंद्र मोदी यांच्या वेबसाईटचं ट्विटर अकाउंट हॅक !

 PM Narendra Modi launches platform for 'Transparent Taxation'

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटवर बुधवारी हॅकर्सनी आक्रमण केलं. हॅकर्सनी मोदी यांच्या 

 वेबसाईटचं ट्वीटर अकाऊंट हॅक केलं. त्यानंतर कोव्हिड-19 रिलीफ फंडासाठी डोनेशन म्हणून थेट बिटकॉईनची मागणी केली. मात्र काही वेळातच ही ट्वीट डिलिट करण्यात आली.

    मोदींच्या वेबसाईटच्या ट्वीटर अकाऊंटवर एक मेसेज लिहिण्यात आला होती. "मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की कोव्हिड19 साठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी रिलीफ फंडासाठी दान करा".

https://twitter.com/narendramodi_in

एकापाठोपाठ एक ट्वीट करण्यात आली. त्यापैकी दुसऱ्या ट्वीटमध्ये असं म्हटलं होतं की हे अकाऊंट जॉन विकने हॅक केलं आहे. आम्ही पेटीएम मॉल हॅक केलेला नाही असंही त्यात लिहिलं होतं. हो दोन्ही ट्वीट डिलिट करण्यात आली.

   पंतप्रधान मोदींच्या वेबसाईट ट्वीटर अकाऊंटचे 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ट्वीटरने गुरुवारी याबाबत माहिती दिली असून हे अकाऊंट हॅक झाल्याचं त्यांच्यातर्फे सांगण्यात आलं.

मोदींच्या वेबसाईटचं अकाऊंट सुरक्षित करण्यासाठी आवश्यक सुरक्षायोजना अमलांत आणण्यात आली आहे.

देशात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. आर्थिक फसवणुकीपासून ते सोशल मीडिया हँडल्स हॅक करण्यापर्यंत हॅकर्सची मजल गेली आहे.