Breaking News

स्व.अटलजींच सरकार कांदा दरामुळे पडलं होतं ते आठवा आणि तात्काळ बंदी हटवा : पूजा मोरे

स्व.अटलजींच सरकार कांदा दरामुळे पडलं होतं ते आठवा आणि तात्काळ बंदी हटवा : पूजा मोरे 
--------------
कांदा निर्यात बंदीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांचा आंदोलनाचा इशारा !


बीड/प्रतिनिधी :
        महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक नियोजन निर्यातबंदीच्या निर्णयामुळे पुर्णतः कोलमडून पडले असून त्यांना जे काही थोडेफार पैसे मिळणार होते ते देखील आता मिळणार नाहीत. मुळात सरकारने जीवनावश्यक वस्तू (सुधारणा)विधेयक २०२० मध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनांचा समावेश केला. यामध्ये कांदा,धान्ये, कडधान्ये,डाळी,फुले,टोमॅटो,बटाटे,तेलबिया यांचा समावेश आहे.
         खरंतर शेतकऱ्यांनी हे पदार्थ लावावेत, सरकारने ते योग्य भावात विकत घ्यावेत आणि लोकांना ते स्वस्त दरात द्यावेत अशी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कांद्याच्या बाबतीत सध्या अतिशय बिकट अवस्था आहे. दुर्दैवाने यंदा पडलेल्या पावसामुळे कांदे गेले. त्यातूनही जे कांदे बाजारात येण्यापुर्वी शेतकऱ्यांनी बंदरात नेऊन लावले. ते आता कंटेनरमध्ये भरता येणार नाहीत. ते आता जागेवरच कुजतील. शेतकऱ्यांच्या हातात काहीही पडणार नाही. तात्काळ बंदी हटवा स्व. अटलजींच सरकार कांद्याच्या दरामुळे पडलं होतं ते आठवा आणि कांद्यावर लादलेली बंदी हटवा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना मा. खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकरच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही आणि कांदा उत्पादक शेतकरी सरकारच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय शांत बसणार नाही. आसा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशध्यक्षा गेवराई पंचायत समिती सदस्या पूजा मोरे यांनी दिला असून अन्यथा केंद्रसरकरला मोठ्या प्रमाणा वर शेतकरी वर्गाच्या रोषाला सामोरे जावे लागेल.