Breaking News

शेतकऱ्याकडे होतं नव्हतं ते सर्व भांडवल यावर्षी मातीमोल; निसर्गाच्या प्रकोपासमोर बळीराजा एकटा लढतोय !

शेतकऱ्याकडे होतं नव्हतं ते सर्व भांडवल यावर्षी मातीमोल;निसर्गाच्या प्रकोपासमोर बळीराजा एकटा लढतोय !
----------------------
कोरोनाने आधी शेती चे कंबरडे मोडले आता त्यावर पाऊसाचा कहर !


शशिकांत भालेकर/पारनेर -
     यावर्षी अस्मानी संकटामुळे सर्वच हतबल आहे मात्र या संकटामध्ये सर्वात जास्त कोणाचे नुकसान झाली आहे तर ते शेतकऱ्याचे झाले शेतामध्ये भांडवल घालूनही हाती काहीच न लागल्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे त्याला यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने त्वरित मदत द्यावी तसेच गेलेल्या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
मार्चमध्ये कोरोना चा कहर आपल्या देशात आणि राज्यात सुरू झाला त्याचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना ही बसला काही कळण्याआधीच लॉकडाऊन सुरू झाला आणि त्यात लाखो रुपयाच्या शेतमालाचे नुसकान शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत झाले पण शेतकऱ्यांनी ते गपगुमान सहन केले कारण होते कोरोना पासून जनतेला वाचवण्याचे शेतकऱ्याने यासाठी आपला लाखो रुपयांचे नुकसान होऊ दिले  घातलेले भांडवल डोळ्यादेखत मातीमोल होताना शेतकर्‍यांनी पाहिले लॉकडाउन असल्याने सर्व बाजारपेठा बंद झाल्या होत्या सर्व आठवडे बाजार मॉल सर्वच सरकारच्या निर्णयाने रातोरात बंद झाले होते त्यामुळे विक्रीसाठी चा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता असे असताना त्या  शेतमालाचे नुसकान भरपाई सोडा शेतकऱ्यांची साधी दखल ही कोणत्याही सरकारने घेतली नाही  


अडचणीतून सावरत शेतकरी कसाबसा पुढील हंगामासाठी उभा राहिला हंगाम सुरू होताच पाऊसही चांगल्या पद्धतीने पडला जूनच्या पहिल्याच आठवड्यात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रामध्ये मुगाची पेरणी उरकवली त्या सोबतच वटाणा  पेरला गेला आणि इथून पुढे शेतकऱ्याची अजून फरफट चालू झाली पेरलेल्या वाटण्याला पावसामुळे शेंगा आल्या नाही ज्या वाटण्याला शेंगा आल्या त्याला बाजार भाव मिळाला नाही आणि शेतकऱ्याचे वाटण्या तील भांडवल डुबले त्यानंतर मुगाची अवस्था अत्यंत वाईट झाली मूग तोडणीला आला असताना संततधार पावसामुळे तोडता येईना काही शेतकऱ्यांनी पावसा मध्ये मजूर लावून तो तोडला मात्र त्याला वाळवण्यासाठी ऊनच पडले नाही त्यामुळे त्या तोडलेल्या शेंगांना बुरशी लागली व संपूर्ण मुग काळवटला  या मुगाची बाजारामध्ये कवडीमोल भावात देखील विक्री होईना अखेर शेतकऱ्याचे मुगात गेलेले भांडवल तर गेले होते मात्र तोडणीसाठी तीनशे रुपये रोजाने मजूर लावून हजारो रुपये पुन्हा मजुरीला घातले  तालुक्यात यावर्षी सर्वदूर यापूर्वी कधी पडला नाही तेवढा पाऊस पडत आहे मात्र यामुळे आता शेतीचे आणि शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आजही पडत असलेल्या पावसामुळे शेतात कोणत्याही प्रकारचा माल येत नाही नुकतेच शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली आहे कांद्याला भाव वाढत आहे त्यामुळे शेतकरी कांदा लागवडीकडे वळले त्यासाठी हजारो रुपये मजुरी बियाणे खते यासाठी खर्च केले मात्र पडत असलेल्या पावसामुळे काही भागांमध्ये कांदा उन्मळून पडला आहे काही कांदे जमिनीशी लोळत आहेत शेतकरी रोज कृषी सेवा केंद्रामध्ये कांदे वाचवण्यासाठी औषधी खरेदी करत आहे मात्र अद्याप शेतकऱ्याला यश आले नाही.


ढगाळ हवामान व सतत बरसणाऱ्या पावसामुळे यात यश येईल याची खात्री नाही सध्या कांद्याचे भाव वाढतात सत्तर टक्क्यांहून जास्त कांद्याचे रोपे वाया गेली पुन्हा रोप टाकण्यासाठी कांद्याचे बी नाही बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे काही ठिकाणी चढ्या भावात बी विकत मिळत आहे.
ह्यावर्षी शेतकऱ्यांचे लाखो भांडवल गेले आहे उत्पन्न तर काहीच मिळाले नाही त्यामुळे कोरोना ने संपूर्ण देशाचे आर्थिक कंबरडे मोडले असले तरी सर्वात जास्त हानी ही शेतकऱ्यांची केली त्यातूनही सावरत शेतकरी कसाबसा उभा राहत होता तर सततच्या पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही पीक आले नाही त्यामुळे सर्वात जास्त नुसकान शेतकऱ्याचे झाले आहे निसर्गाने यावर्षी संपूर्ण जगावर प्रकोप केला आहे मात्र यात बळीराजा मोठ्या धैर्याने लढत आहे हे करत असताना आर्थिक संकटे त्याच्यापुढे आ वासून उभी आहे कुटुंब वाऱ्यावर  पडले आहे याबाबत आता तरी शासन पातळीवरून लक्ष देण्याची गरज आहे याबाबत त्वरित पंचनामे होऊन शेतकऱ्याला नुसकान भरपाई मिळणे गरजेचे आहे बळीराजाला सावरण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र यावे हीच अपेक्षा आहे.

 तालुक्यात सर्वदूर अनेक दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोणताही शेतमाल सध्या चांगल्या अवस्थेत राहिलेला नाही काही ठिकाणी तर शेतमाल खराब झालाच पण जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत किमान दोन ते तीन महिने या जमिनीमध्ये कोणतेही पीक घेता येणार नाही अनेक भागात कांदा लागवड झाली असताना पाऊस सुरू आहे त्यामुळे लाखो हेक्टर कांद्याचे नुकसान होताना दिसत आहे.

  सुरुवातीला झालेल्या लॉकडाऊन मध्ये लाखोचे शेतकऱ्याचे नुकसान झाले मात्र शेतकऱ्यांनी गपगुमान ते सहन केले मात्र आता कोरोना चे संकट अधिक तीव्रतेने वाढत असताना उद्योगपती व्यापारी आदींचे नुस्कान होत असल्याने शासनाला लॉक डाऊन मागे घेण्यास भाग पाडले मात्र शेतकरी त्यावेळेस लाखो रुपयाचा शेतमाल आपल्या डोळ्यादेखत मातीमोल होताना पाहत होता ते फक्त देश हित जपण्यासाठीच मात्र इतरांनी आपल्या आर्थिक नुकसान होते या कारणामुळे लॉक डाऊन होऊ न देता कोरोनाचा प्रसार वाढवण्यास कारणीभूत ठरले आहे याकडेही लक्ष वेधले पाहिजे.