Breaking News

कोपरगाव तालुक्यात १४ रुग्णाची भर तर १९ कोरोना मुक्त दोघांचा मृत्यू

कोपरगाव तालुक्यात १४ रुग्णाची भर तर १९ कोरोना मुक्त दोघांचा मृत्यू


करंजी प्रतिनिधी-
आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ बाधित तर  ११अहवाल निगेटीव्ह आले आहे तसेच खाजगी लॅब च्या अहवालानुसार ७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

भगवती कॉलनी-२
इंदिरा नगर-१
इंदिरा पथ-२
सराफ बाजार-१
बागुल वस्ती-१
गरीमा नगरी-१
घोयेगाव-१
रवंदे-१
मढी खु-१
कोळपेवाडी-१
देर्डे चांदवड-१
मुर्शतपुर-१असे आज १२ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण १४ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील १९ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज नगर येथे पुढील तपासणी साठी ४६  स्राव पाठविण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १२०० तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १०२ झाली आहे.


आज कोपरगाव शहरातील महादेव नगर मधील एका ८५ वर्षीय रुग्णाचा तर मढी खुर्द येथील ५० वर्षीय  रुग्णाचा मृत्यू झाला असून त्या मुळे तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २३ झाली आहे.