Breaking News

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन !

 


जालना । केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी तत्काळ हटवण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्रीय मंत्री तथा जालना जिल्हा खासदार रावसाहेब दानवे पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर आज कांदे फेकून तसेच रावसाहेब दानवे यांचे जालना जिल्हा प्रसिध्दी प्रमुख बाबासाहेब कोलते यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांचा जो कांदा घरी पडून आहे, त्याला योग्य भाव मिळणार नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आतोनात नुकसान होत आहे. तरी आपण तात्काळ निर्यातबंदी मागे घेण्यात यावी अन्यथा 3050 रुपये प्रति क्विंटल दर देण्यात यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रातील एकही केंद्रीय मंत्र्याला तसेच भाजप आमदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही. असा इशारा देण्यात आला.

लवकरात-लवकर कांदा निर्यातबंदी मागे घेण्यात यावी. यासाठी आज रावसाहेब दानवे यांच्या संपर्क कार्यालयावर निदर्शने करण्यात आले. व येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर आक्रमक आंदोलने स्वाभिमानी शेतकरी संघटना करेल असा इशारा गजानन बंगाळे पाटील यांनी दिला. यावेळी जिल्हा उप.अध्यक्ष रवी कदम, प्रसिध्दी प्रमुख दिपक रामेश्वर वाघ, तालुका उप अध्यक्ष संतोष कदम, वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष भारत मगरे आदी उपस्थित होते.