Breaking News

कांदा निर्यातबंदी त्वरीत उठवुन शेतकऱ्यांना दिलासा द्याावा -श्री सुमित कोल्हे

कांदा निर्यातबंदी त्वरीत उठवुन शेतकऱ्यांना  दिलासा द्याावा   -श्री सुमित कोल्हे
    --------                                                                        ( तहसिलदारांना दिले निवेदन 


कोपरगांव / तालुका प्रतिनिधी : 
शासनाने  अचानक कांदा निर्यातीवर बंदी  लावुन शेतकऱ्यांवर  फार मोठा अन्याय केला आहे. अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी  वर्गाला हा खुप मोठा धक्का आहे. ही निर्यात बंदी शासनाने  त्वरीत उठवुन शेतकरी बांधवांना दिलासा द्याावा, अन्यथा तिव्र आंदोलन छेडले जाईल, अशा  आशयाचे निवेदन संजीवनी फाऊंडेशनचे सचिव श्री सुमित कोल्हे यांनी कोविड १९  चे मार्गदर्शक  तत्वे पाळून तालुक्यातील काही शेतकऱ्यांसमवेत  निवासी नायब तहसिलदार योगेश्वर  कोतवाल यांचेकडे दिले.
सदर प्रसंगी शेतकरी री बापुसाहेब सुराळकर, दिनेश  कोल्हे, विकास मोरे, ऋशिकेश  कदम, आण्णासाहेब सोमवंशी , राहुल देवकर, अनुराग येवले व इतर शेतकरी  उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की मागील वर्षातील  दुष्काळ जन्य परीस्थिती व नापिकीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना कोरोना महामारीच्या टाळेबंदीमुळे प्रचंड आर्थिक नुसकसानीला सामोरे जावे लागले. त्यात भर म्हणुन यावर्षी कोपरागांव तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीने  प्रचंड मोठ्या  प्रमाणावर नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती व महामारीच्या दुहेरी संकटाला सामोरे जात असताना शेतकऱ्यांकडे शिल्लक  असलेला थोडाफार कांदा व त्याला नुकताच मिळत असलेला थोडा बरा भाव हा कुठेतरी दिलासा देणारा होता. परंतु शासनाने कांदा निर्यातीवर आणलेल्या बंदीमुळे कांद्यााच्या भावात मोठी घसरण होवुन हातात येवु शकणारे  थोड्याफार  उत्पन्नालाही शेतकरी मुकणार आहे. शेतीमालाचे नुकसान, कर्ज, कोरोना व नैसर्गिक आपत्ती अशा  दुश्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना  सदरची निर्यात बंदी उठवुन दिलासा द्यावा , निवेदनाचा सकारात्मक पाठपुरावा होवुन निर्णय व्हावा, अन्यथा संजीवनी फाऊंडेशन व कांदा उत्पादक समस्त शेतकरी यांच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल.
फोटो ओळीः शासनाने कांदा निर्यात बंदी उठविणेबाबत श्री सुमित कोल्हे यांनी निवासी नायब तहसिलदार श्री योगष्वर कोतवाल यांना निवेदन दिले. यावेळी इतर शेतकरी उपस्थित होते