Breaking News

ऑनलाईन शिकवत असलेल्या अभ्यासक्रमात योग्य नियोजन करा अक्षिता आमले यांची मागणी !

ऑनलाईन शिकवत असलेल्या अभ्यासक्रमात योग्य नियोजन करा अक्षिता आमले यांची मागणी !
---------------
विद्यार्थ्यांनवर मानसिक ताण वाढणार नाही याची खबरदारी घ्या !
--------------
दररोज शिकविल्या जाणाऱ्या विषयाचे योग्य नियोजन करावे !


अहमदनगर/प्रतिनिधी :
     सध्या संपूर्ण जगभर कोरोना आजाराने थैमान घातले असल्याने बहुतांश जग हे लॉकडाउन असल्याने शैक्षणिक संकुले देखील बंद अवस्थेत असल्याचे चित्र निर्माण झालेले असतांना कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्मार्ट फोन चा वापर करत वेगवेगळ्या अँप चा वापर करत घरात राहून १५ जुन पासून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू झाले आहे.परंतु त्या ऑनलाईन संज्ञेचा वापर हा किती फायद्याचा ठरतो ही एक शंकाच असल्याचे चित्र काही भागात समोर येतांना दिसून येत आहे.
       शनिवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी त्याचा अनुषंगाने कोपरगाव येथील अक्षीता आमले यांनी कोपरगाव येथील के बी रोहमारे कला  वाणिज्य  विज्ञान माध्यमिक व  के जे सोमय्या उच्च माध्यमीक महाविद्यालय यांचे प्राचार्य  डाॅ. बी. एस.यादव  उपप्राचार्य  पगारे एस आर  कार्यकारी अधीक्षक डाॅ नाईकवाडे एस सी या कॉलेज प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करत या ऑनलाईन शिकवणी वर्गात योग्य त्या सुधारणा करण्यात याव्या या आशयाचे निवेदन दिले.
        या निवेदनाद्वारे त्यांनी कॉलेज प्रशासनाला विनंती केली की सध्याचा लॉकडाऊन च्या काळात  प्राथमीक  माध्यमिक  महाविद्यालयिन सर्व प्रकारची कामकाजे हे ऑनलाईन पध्दतीने होत आहे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये व नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन अभ्यास घेतला जात आहे हे विद्यार्थीसाठी योग्यच आहे परंतु विद्यार्थ्यांचा बुद्धिमत्ते पेक्षा जास्त अभ्यास देऊन विद्यार्थ्यांवर भार दिल्याचे निदर्शनास आले आहे नुकतेच दहावी पास झालेल्यानी आकरावी ला प्रवेश घेतला आणि  काही  प्रमाणात अभ्यासक्रम सुरू केला आहे परंतु ज्या  विद्यार्थ्यांना जो विषय माहितीच नाही त्या विषयाचा एक भाग शिकून बाकीचा अभ्यास तुम्ही वाचून करा असा प्रकार घडत असल्याची निर्देशनास येत आहे.काही विषयाचे तर एक दिवसाला ८ ते ९  धडे शिकवले जात आहे किंवा काही विषयाचे पी डी एफ पाठवून  तो अभ्यास पूर्ण करून देण्याचे मानसिक दडपण  विद्यार्थ्यांन वर टाकत असल्याचे काही  पालक वारंवार बोलून दाखवत आहे.अशा परिस्थितीत मध्ये  आयुष्याचा नवीन वळणावरील   पायाच कच्चा राहण्याची शक्यतानाकारता येत नाही. त्या मुळे पुढे होणाऱ्या परीक्षेत विध्यार्थ्यांनी पेपर कसे लिहायचं याकडे कॉलेज ने लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा भविष्याचा विचार करावा आणि योग्य पद्धतीने या शिकवणी पद्धतीत बदल करावा या विषयावर चर्चा करत आमले आणि प्राचार्य यांना निवेदन दिले.
     ग्रामीण भागातून नुकतेच माध्यमिक शिक्षण पूर्ण करून शहराच्या ठिकाणी नवीन कॉलेज ला नवीन अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा घाईघाईने ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा सपाटा सुरू झाला असेल तर त्यांचा आयुष्याचा वळणावरील पाया कसा पक्का होणार किंवा त्यांनी येणाऱ्या परीक्षेस  सामोरे कसे जायचे आसा प्रश्न अक्षिता आमले यांनी केला आहे.