Breaking News

पोलिस निरीक्षक राकेश माणगांवकर यांचा सन्मान !

पोलिस निरीक्षक राकेश माणगांवकर यांचा सन्मान !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
 राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री शिवसेना उपनेते बबनरावजी घोलप नाना यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या राष्ट्रीय चर्मकार महासंघ या सामाजिक संघटनेच्या वतीने कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करुन त्यांचा गौरव संघटनेच्या वतीने संपुर्ण देशात होतो आहे त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील कार्यक्षम,कर्तव्यदक्ष ,  पोलिस निरीक्षक हेच शहराचे खरे कोविड योद्धे आहेत ते शिस्तप्रिय न्यायप्रिय असल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांनी त्यांच्या कार्याची दखल घेउन संघटनेचे शिष्टमंडळ कोपरगाव येथे पाठवुन
 राकेश   माणगांवकर  यांचा  राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव नाशिक मनपाचे माजी आयुक्त  दत्तात्रय गोतिसे  व संघटनेचे उत्तर विभागीय अध्यक्ष  दिलीपराव कानडे ,यांचे हस्ते कोपरगाव येथे संघटनेच्या वतीने सन्मानपत्र देउन सत्कार करण्यात आला  यावेळी माजी प स सदस्य तथा जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे ,शहर अध्यक्ष गणेश कानडे नाशिक येथील अँड राजाभाऊ लोहकरे ,अनिल कानडे, ,प्रमोद पवार आदी उपस्थित होते