Breaking News

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करावा-विश्वनाथ कोरडे

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करावा-विश्वनाथ कोरडे
------------
निर्यात बंदीचा निर्णय रद्द न केल्यास नगर- पुणे महामार्गावर करणार अंदोलन.


पारनेर प्रतिनिधी - 
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करावा अशी मागणीचे निवेदन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तहसीलदारांना देण्यात आले यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र सरकारने कांदा जीवनावश्यक वस्तू मधून वागळलेला आहे असे असताना निर्यात बंदी करण्यात आली जेव्हा कांद्याला बाजार भाव मिळत नाही तेव्हा केंद्र आणि राज्य शासन कुणीच काहीच मदत शेतकऱ्यांना करत नाही एकरी 30 हजार रुपये कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी खर्च केल्यानंतर यातून दोन पैसे मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा असते मात्र उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होते.
 केंद्र सरकारने दि .१४ रोजी निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला असुन सदर निर्णयाचे विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. मागील काळामध्ये कांद्याचे बाजारभाव ५-६ रु एवढे खाली आले असताना शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असुन केंद्र आणि राज्य शासनाकडून कांद्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. असे असून कांद्याचे बाजारभाव नुकतेच काही प्रमाणात वाढलेले असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाची थोडीफार मदत मिळायला सुरुवात झाल्याबरोबर केंद्रशासनाने निर्यातबंदी केल्याने कांद्याचे बाजारभाव पुन्हा कमी व्हायला लागले आहेत. अशा परिस्थीतीत शेतकऱ्यांचे अर्थकारण पुन्हा अडचणीत येऊ शकते. झालेल्या निर्यातीचा फेरविचार करून कांद्याची निर्यात बंदी ऊठवावी या संदर्भात तहसीलदार यांनी पारनेरच्या शेतकऱ्यांच्या भावना केंद्र शासनाला कळवाव्यात 
तसेच केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांना निवेदन मेल करण्यात आले आहे केंद्र सरकारने घेतलेला निर्णय रद्द न केल्यास पुढील काळात सुपा येथे नगर- पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात रस्तारोको करून अंदोलन करण्यात येईल असे विश्वनाथ कोरडे यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुनील थोरात युवा मोर्चा पारनेर तालुक्याचे उपाध्यक्ष सागर मेंड पारनेर शहराध्यक्ष भीमाशेठ औटी तालुका उपाध्यक्ष काशिनाथ नवले, बाबाजीशेठ येवले, किसन शिंदे, विलास हार्दे, मनोहर राऊत, आप्पा फडके, डाॅ.सचिन जाधव, अमोल पोटघण,गणेश सालके, अनंथा जगदाळे, किशोर गोपाळे, बाळासाहेब नवले, दामा कारखिले व तालुक्यातील आदी शेतकरी उपस्थित होते.

  माझा पहिला पक्ष शेतकरी नंतर भाजप!
 कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा मी शेतकरी म्हणून हि मागणी केली आहे मी पाहिला शेतकरी आहे व नंतर भाजप कार्यकर्ता एखादी गोष्ट सरकारची चुकत असेल तर कार्यकर्त्यांच्या भावना त्याच्यापर्यंत पोचवल्या पाहिजे.
-----------
विश्वनाथ कोरडे
माजी तालुकाध्यक्ष भाजप पारनेर.