Breaking News

पुणे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण घटलं; विभागीय आयुक्तांचा दावा पुणे | गणेशोत्सवानंतर शहरातील कोरोनाबाधितांचं प्रमाण 32 टक्क्यांवर पोहचलं होतं. मात्र आता हे प्रमाण घटून 24 टक्क्यांवर आलं असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

गणेशोत्सवात नागरिक एकमेकांच्या संपर्कात आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण वाढलं होतं. पण येत्या आठवड्यात हे प्रमाण आणखी कमी होईल त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

17 सप्टेंबरपर्यंत बाधितांची संख्या दररोज एक हजार नऊशे इतकी होती. त्यानंतर 26 सप्टेंबरपर्यंत ती एक हजार सातशेवर आली. सध्या हे प्रमाण दीड हजाराच्या जवळपास आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हे प्रमाण 15 टक्के एवढे आहे तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाधित रुग्णांची संख्या 13 टक्क्यांवर गेली असल्याचं विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं आहे.