Breaking News

दीपिका, सारा, श्रद्धाचे मोबाइल फोन जप्त

 - एनसीबीची कारवाई : अनेक बाबींचा भंडाफोड होणारमुंबई/ प्रतिनिधी

बॉलिवूड ड्रग प्रकरणाची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शनिवारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी केली होती. एनसीबीच्या या पथकाने दीपिका, सारा, रकुलप्रीत आणि इतरांचे फोन जप्त केल्याचे आता पुढे आले आहे. त्यातून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा होणार आहे.

एनसीबीच्या चौकशीनंतर दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग, फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचा फोन ताब्यात घेण्यात आला आहे. यापूर्वी एनसीबीने सुशांतसिंह राजपूतची टॅलेन्ट मॅनेजर जया साहा आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांचे फोनही ताब्यात घेतले होते. या सगळ्यांच्या फोनचा जुना डेटा मिळवला जाईल. तपासासाठी या डेटाचा फार उपयोग होईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. एनसीबीने दीपिका पादुकोणची सुमारे 5.30 तास चौकशी केली. त्यात तीनवेळा रडली. ऑक्टोबर 2017 मध्ये दीपिकाने तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशकडे ड्रग्ज मागितल्याचे चॅट एनसीबीच्या हाती लागले होते. यानंतर दीपिकाचा चौकशीसाठीचा समन्स पाठवण्यात आला. चौकशीदरम्यान दीपिकानेही ड्रग्ज चॅट केल्याची कबुली दिली. पण ड्रग्ज घेण्यावर स्पष्ट नकार दिला.