Breaking News

कोपरगावात मूर्ती संकलनास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद !

कोपरगावात मूर्ती संकलनास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
करंजी प्रतिनिधी-
कोपरगाव शहरातील कोरोनाच्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशविसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी तसेच जलप्रदुर्षण होऊ नये यासाठी कोपरगाव प्रशासनाने कोपरगाव शहरात ठीक-ठिकाणी मूर्ती संकलन केंद्राची उभारणी केली आहे यावर्षी नागरिकांना थेट गोदावरी नदी पात्रात गणेशविसर्जन करू नये असे आदेश ही प्रशासनाने प्रसारित केले होते.कोरोनाची वाढती साखळी तोडण्या करिता व संपर्क टाळण्या करीता नगरपालिकेने हा उपक्रम राबिविला आहे.जेने करून नागरिकांची गर्दी होणार नाही व कोरोनाची साखळी वाढणार नाही.

नगरपालिकेच्या या मूर्ती संकलन केंद्राच्या उपक्रमाचे सर्व नागरिकांनी स्वागत केले असून मूर्ती संकलन केंद्रावर प्रशासनाच्या नियमाचे पालन करत आपले घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन केले. नगरपालिका प्रशासन या सर्व मूर्तीचे विधिवत पूजन करून विसर्जन करणार आहे नागरिकांनी ही या नगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक करत भरभरून प्रतिसाद दिला आहे असे दृश्य सर्वत्र  दिसून येत होते.
   या सर्व संकलन केंद्रावर  सकाळ पासून  कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व त्यांचा सर्व नगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यासह  बारकाईने  लक्ष ठेऊन होते त्यांचा सोबत मदतीला कोपरगावतील अनेक गणेश भक्त व सामाजिक कार्यकर्ते मूर्ती संकलन केंद्रावर उभे राहून नागरिकांना मार्गदर्शन करत मदत करतांना दिसत होते.
   या वेळी गोदावरी तीरावर नगरपालिका स्वछता दूत व गोदा माई प्रतिष्ठाने संस्थापक आदिनाथ ढाकणे व त्यांचा सर्व मित्र परिवाराने स्वतः मूर्ती संकलन केंद्रावर उभे राहत गणेश मूर्ती चे संकलन केले.