Breaking News

रवंदेच्या उभारत्या चित्रकार चैताली ची विधानसभा संपर्क प्रमुखांनी घेतली दखल !

रवंदेच्या उभारत्या चित्रकार चैताली ची विधानसभा संपर्क प्रमुखांनी घेतली दखल


करंजी प्रतिनिधी-
माणसाच्या अंगात कला ही उपजतच असते तिची जाणीव झाली की ती कोणत्याही रूपाने बाहेर पडत असते.अशीच एक घटना कोपरगाव तालुक्यात दिसून आली आहे.
    कोणतेही प्रशिक्षण अथवा शिकवणीचे क्लास न लावता  तालुक्यातील रवंदे  येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिवशंकर विद्या मंदिरात शिक्षण घेणारी कु. चैताली शंकर काळे या विद्यार्थीनीने दहावीमध्ये ९५.४०% मार्क घेऊन शाळेत पहिला नंबर मिळविला आहे. कु. चैताली काळे हिची घरची आर्थिक परिस्थिती अत्यन्त बेताची आहे. तिचे वडील शेतकरी असून शेतीला भांडवल नसल्याने शेती तीन ते चार वर्षेपासून पडीक आहे. तिचे वडील गावातुन उसने पैसे तसेच व्याजाने पैसे घेऊन घर चालवीत आहेत. त्यातच  मुलांचे शिक्षण पूर्ण करत आहे, कु. चैताली ही अभ्यासात हुशार तर आहेच पण तिची चित्रकालाही अफलातून आहे .परंतु तिचे कलेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला नाजूक आर्थिक परिस्थितीचा  सामना करावा लागत आहे.          
 लॉकडावूनच्या काळामध्ये तीने अनेक चित्रे काढली आहेत.नुकतेच तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे हुबेहूब चित्र फक्त पेन्सिलच्या साहायाने काढले. हे चित्र काढत असतांना तिची पेन्सिल संपली म्हणून तिने लिंबाची काडी जाळून त्या काडीच्या सहाय्याने चित्र पूर्ण केले. तसेच ती शाडूच्या मुर्त्या सहज बनवते .यातूनच तिची जिद्द लक्षात येते.आज तिला आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. या बाबतची माहिती समजताच  शिवसेनेचे तिरोडा विधानसभा संपर्क प्रमुख श्री प्रवीण शिंदे यांनी कु. चैतालीची तिच्या घरी भेट घेऊन तिने रेखाटलेली सर्व चित्रं बघितल्यानंतर त्यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्री निलेश धुमाळ यांना फोन करून सर्व माहिती दिली.यानंतर  निलेश धुमाळ यांनी ताबडतोब पुण्याहुन  येऊन कु. चैतालीच्या घरी तिची भेट घेतली व तिचा शिवसेनेच्या वतीने तिचा सत्कार करून कौतुक केले. या प्रसंगी तिचे वडील -शंकरराव काळे तसेच विधानसभा संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे, मनोज कपोते- विधानसभा संपर्क प्रमुख -साकोली,बालाजी बोर्डे -उपशहर प्रमुख उपस्थित होते.
-----------------------------------------
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चैताली शिक्षण घेत आहे. ती अभ्यासाबरोबरच चित्रकलेतही हुशार आहे. कु.चैतालीचा पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.
 - निलेश धुमाळ,प्रवीण शिंदे-
            विधानसभा संपर्क प्रमुख ,शिवसेना