Breaking News

राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र !

 Shiv Sena doesn't need new flag': Uddhav Thackeray derides cousin Raj on  Hindutva debate - Republic World

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी या पत्रातून खासगी डॉक्टरांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. 'खासगी सेवेतील डॉक्टरांना विमाकवच नाकारणे असंवेदनशील आहे. खासगी सेवेतील डाँक्टरांना मृत्यूनंतरही कुटुंबाला 50 लाखाचा विमा मिळायला हवं', असं राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackerays letter to CM Uddhav Thackeray)

राज ठाकरे पत्रात म्हणतात, 'खासगी डॉक्टरांचं शिष्टमंडळ मला भेटलं. त्यांचं कार्य प्रशंसनीय आहे. पण त्यांनी सरकारी अनास्था सांगितली, त्याने माझं मन विष्णण्ण झालं. कोरोना संसर्गाच्या काळात सरकारने खासगी डॉक्टरांना दवाखाने बंद न करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉक्टरांनी व्यवसायाशी बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णसेवा सुरुच ठेवली.


यादरम्यान सरकारने कोव्हिड योद्धे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी मग ते सरकारी असो की खासगी या सर्वांना 50 लाखाचं विमाकवच देण्याचं परिपत्रक सरकारने काढलं. मात्र आता खासगी डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबाला 50 लाखांच्या विम्याचा लाभ देण्याचं सरकार नाकारत आहे. हे डॉक्टर खासगी सेवेत होते म्हणून नाकारलं जात असल्याचं कारण दिलं जात आहे. पण मुळात हे विमा कवच केंद्राच्या योजनेप्रमाणे मिळत असताना, राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?'

सरकार जर डॉक्टरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देणार असेल, मात्र त्याचवेळी स्वत:ची जबाबदारी विसरणार असेल तर हे चुकीचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याप्रकरणी लक्ष घालून खासगी सेवेतील डॉक्टरांनाही योग्य न्याय द्यावा,