Breaking News

"परिक्रमा" मध्ये माजी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन मेळावा !

"परिक्रमा" मध्ये माजी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन मेळावा !


काष्टी/प्रतिनिधी : 
कॉलेजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपापल्या  करियर साठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र ज्या कॉलेज मध्ये आपण शिकलो, आपल्या करियर विषयी मार्गदर्शन मिळाले, कॉलेज मधील शिक्षकांशी मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. अशा  सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. मात्र मोठा कालखंड लोटल्या नंतर प्रत्येकजण आपापल्या नोकरी धंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही आणि सध्याच्या कोरोना परिस्थिती मुळे सर्वांनी एकत्र येणे फारच दुर्मिळ झाले आहे मात्र ते अशक्यही  नाही हे श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील मा. ना. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट च्या 'परिक्रमा' शैक्षणिक संकुलातील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालया मधील माजी विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आणि दि. ३०/०८/२०२० रोजी "ऑनलाईन माजी विद्यार्थ्यांचा मेळावा" आयोजित केला अशी माहिती अल्युमिनी इनचार्ज  प्रा. सचिन अनभुले यांनी दिली.  
या ऑनलाईन माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्याला महाविद्यालया च्या स्थापनेपासून तर आतापर्यंत च्या सर्व माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सर्वांनीं एकमेकांशी संवाद साधून कॉलेज जीवनातील आपल्या जुन्या आठवणी मध्ये रमले. आगामी काळातील परिक्रमा संस्थे च्या विविध उपक्रमांमध्ये या सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी केले.
      या मेळाव्या मध्ये कोविड-१९ मध्ये ज्यांनी आपल्या मेडिकल स्टोअर (कॉरोना वॉरियर्स) च्या माध्यमातून जोखमीचं काम केले अश्या सर्वांचे कौतुक करण्यात आले. पुढील काळात प्लेसमेंट, विविध सामाजिक उपक्रम, गेस्ट लेक्चर च्या माध्यमातुन सगळी मदत करण्याचे अश्वासन  माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात बोलताना दिले.  
     "ऑनलाईन माजी विद्यार्थ्यांचा मेळावा" या वेगळ्या अश्या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थे च्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव श्री. विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रतापसिंह पाचपुते, संकुल संचालक डॉ. विजय पाटील व मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अनिल पुंड यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व "परिक्रमा कॉलेज ऑफ फार्मसी, माजी विद्यार्थी असोसिएशन" मधील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.