Breaking News

पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथे एक लाख चार हजार रुपयाची चोरी !

पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथे एक लाख चार हजार रुपयाची चोरी !
---------
दरवाजा लावून शेतात कामासाठी गेल्यानंतर अज्ञाताने मारला सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला!
---------
दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे दैठणे गुंजाळ परिसरामध्ये
घबराटीचे वातावरण.


पारनेर प्रतिनिधी - 
     पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील एका शेतकऱ्याच्या घरामध्ये दिवसाढवळ्या चोराने एक लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली याबाबत पारनेर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिवसाढवळ्या लाख रुपयांची चोरी झाल्यामुळे परिसरामध्ये घबराट पसरली आहे.
     पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेमध्ये भिमराज कुंडलीक घोलप वय ३८ वर्षे धंदा शेती राहणार दैठणे गुंजाळ ता. पारनेर हे घराचा दरवाजा लावून शेतात कामासाठी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक करून ५०,००० रुपये रोख रक्कम , २०,००० रु किमतीचे सोन्याचे गंठण चैन ११ ग्रॅम वजन ,१७,००० रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे पदक व मनी असलेले सोन्याचे मंगळसूत्र, १७,००० रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे नेकलेस या वर्णनाचे व एकूण १,०४,००० रु किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ही लबाडी च्या इराद्याने स्वतःच्या आर्थिक फायदे करिता चोरून नेले आहे याबाबतची फिर्याद भिमराज घोलप यांनी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे त्यानुसार अज्ञाता विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बालाजी पद्मने करत आहेत.