Breaking News

मयत सभासदाच्या वारसास एक लाखाचा धनादेश प्रदान !

मयत सभासदाच्या वारसास एक लाखाचा धनादेश प्रदान


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी
    सहकार महर्षी कोल्हे  सहकारी साखर कारखान्याचे माहेगाव देशमुख येथील मयत सभासद वारस पत्नी श्रीमती. लिलाबाई सूर्यभान पानगव्हाणे यांना विम्याचा एक लाख रुपयाचा धनादेश कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
   याप्रसंगी संचालक सोपानराव पानगव्हाणे, माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, संजीवनी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. पानगव्हाणे, आदी उपस्थित होते. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्याकडून सभासद व कामगारांचा जनता अपघात विमा उतरविला आहे.  सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे सभासद सूर्यभान  जानकु पानगव्हाणे यांचे नुकतच अपघाती निधन झाले होते. त्याबाबत सर्व कागदपत्रांची पूर्तता विमा कंपनी कडे करण्यात आली. कारखाना व न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश मयत सभासद वारस श्रीमती लिलाबाई पानगव्हाणे यांना अदा  करण्यात आला आहे.