Breaking News

अकोल्यात करोन कमी होईना पुन्हा ३६ पॉझिटिव्ह, आमदार लहामटेंनी घेतला आढावा!

अकोल्यात करोन कमी होईना  पुन्हा ३६ पॉझिटिव्ह, आमदार लहामटेंनी घेतला आढावा!


अकोले/ प्रतिनिधी :
अकोले तालुक्यात  कोरोनाचा आलेख काही कमी होण्याचे  नाव घेत नाही आज  पुन्हा ३६ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे  
कोतुळ येथे   ०३ अकोले शहरात ०३,राजुर येथे  ०१ ,निब्रळ येथे  ०३ कुंभेफळ  येथे ०३ पिंपळगाव निपाणी  येथे ०३,पिंपळगाव नाकविंदा येथे ०२ गणोरे येथे ०३ सुगाव येथे ०२ रुंभोडी येथे 2 कातळापूर येथे ०१ पडोशो येथे ०१ सावरगाव।पाट येथे ०१   ,गर्दणी येथे ०१ ,नवलेवाडी येथे ०१ ,इंदोरी  येथे०१ ,निळवंडे येथे०२ ,मेहदुंरी येथे ०१  , कळस येथे ०१ असे दिवसभरात
 एकुण ३६ नवीन व्यक्तीचा  कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला असल्याने तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या १२७१ झाली आहे या पैकी १०६४ रुग्ण कोरोना मुक्त झाले ,२० रुग्णांचा  मृत्यू झाला आहे तर १८७ व्यक्ती उपचार घेत आहे
आमदार डॉ किरण लहामटे यांनी  आज  पंचायत समिती कार्यालतात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कोरोना संदर्भात बैठक घेतली  पुढील  काळात करोन रुग्णांना वेळेत उपचार व्हावेत  रुग्णांची गैरसोय होणार नाही याबाबत  बैठक घेतली यावेळी तहसीलदार व  तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते अकोल्यात  डॉ भांडकोळी यांचे खाजगी हॉस्पिटल मध्ये 50 खाटांचे कोव्हिडं उपचार  सेंटर उभारण्याबाबत  चर्चा झाली
-------