Breaking News

कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या त्या निविदा रद्द करा

कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या त्या निविदा रद्द करा

कोपरगाव / ता.प्रतिनिधी 
ग्रामपंचायतची विकास कामे करताना त्या कामांची ई-प्रणाली प्रक्रिया राबविताना कुठलाही अधिकृत शासन निर्णय नसताना नियम व अटीं मध्ये स्थळ पहाणी दाखल्याची बेकायदेशीर अनाधिकृत मनमानी अट टाकली या मनमानी अटीला तिव्र विरोध होताच जिल्हा परिषदेने पारित केलेली ही अट परत लेखी आदेश देत रद्द केली माञ या कालावधीत स्थळ पहाणी दाखला घेऊन तालुक्यातील ग्रामपंचायतींनी दिलेली कामेही रद्द करावे अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील इंजिनियरांनी केली आहे.
        ग्रामपंचायत कार्यालया मार्फत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रणाली मध्ये शासन निर्णय बाजुला ठेवून मनमानी पध्दतीने ई'-निविदा , राबविण्यात आल्या आहे त्या मध्ये कुठलाही शासन निर्णय नसताना स्थळ पहाणी अहवाल नसताना ही अट टाकुन गोपनीयतेचा भंग केला आहे स्थळ पहाणी टाकुण शासकिय नियमांची पायमल्ली करण्यात येऊन आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम उपलब्ध करुन देऊन भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे जी  कामे ई निविदा द्वारे  पारदर्शक पद्धतीने राबविल्यास निकोप स्पर्धा होवून अंदाज पञकीय रकमेपेक्षा कमी दराने म्हणजे १०ते १५टक्के कमी दराने जातात . शासनाचे बरेच पैसे  शिल्लक राहतात  व राहिलेल्या पैशामध्ये इतर विकास कामे होतात यामध्ये सदर ग्रामपंचायतीने  गोपनियतेचे कोणतेही निकष पाळलेले नाही   त्यामुळे सदर प्रक्रिया अतिशय बेकायदेशीर असल्यामुळे शासनाने ताबडतोब अशा निविदा रद्द करून नवीन पारदर्शकपणे ई निविदा पद्धतीने शासन निर्णयाची अंमलबजावणी करून राबविण्यात याव्या आपल्या वैयक्तिक स्वार्था साठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी  गेली दोन महिन्यापासून हा नियम अलिखित स्वरूपात राबविला  मात्र 15 सप्टेंबर रोजी लेखी परिपत्रक काढताच या पत्रकाला  जिल्ह्यातून प्रचंड विरोध होताच अखेर हे शासकीय नियम डावलून  काढलेले अनधिकृत परिपत्रक दिनांक 21 सप्टेंबर रोजी रद्द केले जसे हे स्थळ  पाहणी  अहवालाचे परिपत्रक रद्द केले तसेच हा स्थळ  पाहणी अहवाल  जोडून  ग्रामपंचायतीने दिलेले कामे ही रद्द करावी अन्यथा तालुक्यातील स्थळ पाहणी दाखला जोडून  दिलेल्या ग्रामपंचायतींच्या नावा व कामांनिशी यादी  कोर्टात दाखल करून या मागणी साठी कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे