Breaking News

जनावरांना चारा देऊन मुलीचा वाढदिवस साजरा, शिंगणापुरच्या सरपंचाचा प्रेरणादायी उपक्रम !

जनावरांना चारा देऊन मुलीचा वाढदिवस साजरा !
-------------
शिंगणापुरच्या सरपंचाचा प्रेरणादायी उपक्रम !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी
     ग्रामपंचायतच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना गावात राबवून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणयात यशस्वी झालेल्या तालुक्यातील शिंगणापुर गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनिता भिमा सवंत्सरकर व त्यांचे पती भगवती फर्निचर चे संचालक भिमा सवंत्सरकर यांनी लेकीचा वाढदिवसानिमित्ताने गौशाळेतील जनावरांना चारा देण्याचा प्रेरणादायी पायंडा पाडला आहे.


     अनेकजन भरमसाठ खर्च करुन आपला वाढदिवस साजरा करत असतात माञ कोपरगाव तालुक्यातील शिंगणापुर गावचे लोकनियुक्त सरपंच सुनिता भिमा सवंत्सरकर व गोकुलधाम गौरक्षा केंद्र चे प्रमुख मार्गदर्शक भिमा संवत्सरकर यांनी आपली कन्या कु मयुरी हिचा वाढदिवस कोरोना महामारी च्या संकटात अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गौशाळेतील जनावरांना चारा देऊन मित्र परिवारा समवेत गौशाळेत साधेपणाने साजरा केला. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थानाचे महंत रमेशगिरी महाराज यांचा आर्शिवाद घेऊन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.