Breaking News

शेडगाव येथील विनापरवाना खते व किटकनाशक साठा जप्त तर संबधीत विक्रेत्यावर कृषी विभागाकडून गुन्हा दाखल !

शेडगाव येथील विनापरवाना खते व किटकनाशक साठा जप्त तर संबधीत विक्रेत्यावर कृषी विभागाकडून गुन्हा दाखल !


 श्रीगोंदा तालुका/प्रतिनिधी :
      शेडगाव तालुका श्रीगोंदा येथे विनापरवाना खते साठवणूक करणे व विक्री करणे या विरोधात सिद्धीविनायक कृषी सेवा केंद्राचे चालक विजय रघुनाथ पवार, रा. जलालपुर ता. कर्जत यान्च्या विरोधात कृषी विभागाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
     खत नियंत्रण कायदा, किटकनाशक कायदा व अत्यावश्यक वस्तू कायदा अतंर्गत तरतुदीचा भंग केल्या बद्दल सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधीत कृषी सेवा केंद्र हे कोणत्याही परवान्या शिवाय कार्यरत होते. सदरील कृषी सेवा केंद्राची तपासणी, पंचनामा सील करण्याची कारवाई पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी व डॉ. राम जगताप यांच्यासह,  श्री अमजद ताम्बोळी, श्री. किसन सांगळे व संदीप बोदगे  यांच्या भरारी पथकाने केली. कारवाई दरम्यान रु. ३.२९लक्ष रक्कमेची खते तर रु. १.२६ लक्ष रक्कमेची किटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. 
     या बाबतीत श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे संबधीत विक्रेत्यावीरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन, या पुढील प्रवास सहा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश गावित हे करत आहेत. 


खत, बियाणे व किटकनाशके विक्रेत्यांनी या कायद्याचे सक्तीने पालन करावे , कायद्याचे उल्लंघन केल्यास कृषी विभागाकडून फौजदारी कारवाई केली जाईल , असा इशारा पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी यांनी दिला आहे..