Breaking News

५ नंबर साठवण तलावाचे आमदार आशुतोष काळे यांना श्रेय जाऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप – संदीप वर्पे

५ नंबर साठवण तलावाचे आमदार आशुतोष काळे यांना श्रेय जाऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप – संदीप वर्पे
-------------
हे तर सत्ताधारी विरोधकांचे कोपरगाव शहरवासीयांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे  षड्यंत्र -गटनेते विरेन बोरावके

 राष्ट्रवादी व शिवसेना नगरसेवकांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना गटनेते नगरसेवक विरेन बोरावके व संदीप वर्पे व नगरसेवक.
                       
  कोपरगाव प्रतिनिधी  -
कोपरगाव शहराच्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी मागील पाच वर्षापासून पाच नंबर साठवण तलावाचे कामासाठी विविध आंदोलन केले असून आमदार होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मदतीने या पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाई काम पूर्ण केले आहे. पुढील कामासाठी निधी मिळाविण्यासाठी विचार विनिमय होवून या कामाला चालना मिळावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेला तहकूब करण्याची मागणी म्हणजेच ५ नंबर साठवण तलावाचे आमदार आशुतोष काळे यांना श्रेय जावू नये यासाठी केलेला खटाटोप असल्याचे व कोपरगाव शहरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे सत्ताधारी विरोधी नगरसेवकांचे मोठे षड्यंत्र असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष नगरसेवक संदीप वर्पे व गटनेते नगरसेवक विेरेन बोरावके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
                    कोपरगांव नगरपालिकेची मंगळवारी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती सदरची सभा मुख्याधिकार्‍यांनी शासनाच्या निर्देशानुसार व्हिडिओ कॉन्फरन्सची रचना करुन आयोजित केली होती या सभेमध्ये ऐकायला येत नाही अशी ओरड भाजपा-सेना नगरसेवकांनी करुन काल सभात्याग केला त्याचा खरपूस समाचार घेतांना गटनेते नगरसेवक विरेन बोरावके व संदीप वर्पे म्हणाले की, सदर व्हीडीओ कॉन्फरन्स सभेचे उत्तम प्रकारे आयोजन करण्यात आले होते व सुरु असलेल्या सभेच्या कामकाजाचा आवाजही एकमेकांना ऐकू येत असतांना केवळ सभेमध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा होवू नये यासाठी त्यांनी सभात्याग केल्याचा आरोप केला असल्याचे सांगितले. कोपरगांवचा पिण्याचा पाण्याचा कायमचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी निवडून येण्यापूर्वी महत्प्रयास केले. हा  प्रश्‍न धसास लावला व निवडून आल्यानंतर पाच नंबर साठवण तलावाचा प्रश्‍न धसास लावून तो केवळ दोन ते तीन महिन्यात मार्गी लावला. या तळयाला काहींनी अनेक अडथळे आणले नव्हे तर हे तळे होऊच नये म्हणून प्रयत्न केले परंतु ते निरुपयोगी ठरले. आता पाच नंबर तळयाचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर त्यांची पायाखालची वाळु घसरु लागली आहे. या तळयासाठी ५७ ते ५८ कोटीचा निधी लागणार असून सभेत या विषयावर महत्वाची चर्चा होणार होती केवळ आमदार आशुतोष काळे यांना श्रेय जाऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप असल्याचे ते म्हणाले .
         कोपरगाव शहरातील नागरिकांचे जिव्हाळ्याचा असलेला पाच नंबर साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लागावा तसेच इतर शहर विकासाचे प्रश्न सुटावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार शासनाच्या नियमाप्रमाणे व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे मिटिंग आयोजित केली होती. मात्र शहरविकासाची मानसिकता नसलेल्या सत्ताधारी विरोधक नगरसेवकांनी हि सभा तहकूब करण्याची मागणी केली होती. त्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या व शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष नगरसेवक संदीप वर्पे व गटनेते नगरसेवक विेरेन बोरावके बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी नगरसेवक मंदार पहाडे,सौ.प्रतिभा शिलेदार, सौ.माधवी वाकचौरे,सौ.सपना मोरे,सौ.वर्षा शिंगाडे,हाजी मेहमूद सययद, माजी नगरसेवक दिनकर खरे, फकिरमामु कुरेशी,रमेश गवळी,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,सुनील शिलेदार,संतोष चवंडके,आदी उपस्थित होते.यावेळी विेरेन बोरावके म्हणाले की, कोपरगांव नगरपालिकेची मंगळवारी झालेली सभा ही वैध असून कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शासनाचा अध्यादेश असतांनाही व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे सभा घेण्यास विरोधकांनी विरोध केला हे अवैध आहे. केवळ पाच नंबर तळयाचे काम मार्गी लागेल. शहरवासीयांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा होईल आपली राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल याची धास्ती घेवून विरोधकांनी केवळ बहुमताच्या जोरावर सदरच्या मिटींगला आक्षेप घेतला व पाच नंबर तळया संदर्भातील विषय सभेच्या पटलावर चर्चिला जाऊ नये यासाठीच त्यांनी सगळा आकांडतांडव केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
       यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष नगरसेवक संदीप वर्पे म्हणाले की,  ४९ कोटीची बंदिस्त पार्इप लार्इन वाढीव पाणीपुरवठा योजनेचे त्यांनी थर्ड पार्टी ऑडीट करण्याची मागणी केली ती बरोबर की चुकीची या वादात न पडता प्रत्यक्षात या योजनेचे वरील मंडळी सत्तेत असतांना थर्ड पार्टी ऑडीट झाले आहे व ते नासिक येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून झालेली असल्याचा खुलासा केला तसेच सदरची योजना रखडल्याची ते ओरड करतात मग याच सभेमध्ये मुंडे या कंत्राटदाराला बोलावून जाब विचारता आला असता. तसे झाले नाही. तसेच वरील योजनेचे काम पूर्वी निसर्ग कन्सल्टन्सीकडे सोपवले होते ते त्यांनी सोडून दिले असे ते आरोप करतात तो चुकीचा आहे वास्तविक या ४२  कोटी पाणी योजनेची मुदत वाढ घेतांना आलेल्या विषया बरोबर या एजन्सीची नेमणुक करण्याचा विषय आला हा विषय आर डी सोनवणे यांनी मांडला तर अतुल काले यांनी अनुमोदन दिले आहे निसर्ग कन्सल्टसीने काम सोडले नाही तर त्याची नेमणुक यांनीच रद्द केल्याचा खुलासा यावेळी झाला. या योजनेची किंमत केवळ ३८.८९ कोटी असतांना ती ४२ कोटी कशी झाली असा सवाल संदिप वर्पे यांनी यावेळी केला. जर नगराध्यक्ष वहाडणेंच्या काळात ८ कोटीची बिले निघाली अशी त्यांची तक्रार असेल तर मग जेंव्हा या योजनेचा शुभारंभ होवून काम योजना अर्धवट राहिली तरीही विरोधकांनी त्यावेळी सत्तेत असतांना १८ कोटीची बिले कशी काढली असा सवाल वर्पे यांनी केला. यावेळी विषय नं.२० व २१  आरक्षीत जागे संदर्भात केलेल्या आरोपाचे संदीप वर्पे यांनी खंडन करतांना आम्ही एक एकराचे श्रीखंड खाल्ले असेल तर तुम्ही ४५४ गुंठे क्षेत्राचे आम्रखंड खाल्ले का? असा सवाल केला. विरोधकांना बोलायला कुठलेच विषय शिकले नाही व यांच्या कर्तृत्वामुळेच त्यांना मागच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. कोपरगावच्या नागरिकांना प्रामाणिकपणे काम कोण करीत आहे याची जाणीव असल्यामुळे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांना कोपरगाव शहराच्या सुज्ञ मतदारांनी अडीच हजार मते अधिक दिले असून ज्या बहुमताच्या जोरावर तुम्ही कोपरगाव शहराच्या नागरीकांना वेठीस धरता ती जनता तुमचे बहुमत काढून घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगितले. नगसेवक मंदार पहाडे म्हणाले की, सभेच्या सुरु असलेल्या कामकाजाचा  सर्व नगरसेवकांना आवाज ऐकू येत असतांना विरोधी एक-दोन नगरसेवकच आवाज येत नसल्याचा कांगावा करीत होते. पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाले तर आपली राजकीय गणित बिघडतील याची त्यांना धास्ती वाटत आहे. सत्ता असतांना पाच नंबर साठवण तलावाचे काम मार्गी लावू न शकणाऱ्या विरोधकांना आमदार आशुतोष काळेंच्या कामाची गती पाहून त्यांच्या मनात भीतीचा गोळा उठला आहे. आमदार आशुतोष काळे शहरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना खोडा घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असून त्यांचा मनसुबा आम्ही कदापि पूर्ण होवू देणार नाही. शिवसेना नगरसेविका सपना मोरे म्हणाल्या की, शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी सर्व मिटिंग बैठका या ऑनलाइन घेण्याच्या सूचना दिलेल्या असतांना विरोधकांनी हि सभा ऑफ लाईन घेण्याची चुकीची मागणी करून हि सभा आठ दिवसांनी घ्यावी अशी केलेली मागणी शहरविकासाला खीळ घालणारी असून आठ दिवसात बैठक घेण्याचे  निर्देश बदलले असते का?असा सवाल विरोधकांना केला आहे.सर्व नगरसेवकांना या मिटींगचा आवाज येत होता. मिटिंग अजेंड्यावर शहर विकासाचे विषय होते.शहर विकासाच्या कामावर चर्चा होणे गरजेचे होते. सत्ताधारी विरोधक नगरसेवकच ठेकेदार आहेत.आमदार आशुतोष काळेंनी विकासासाठी निधी आणला त्यांच्यासारख्या शहर विकासाचा निधी पळविला नाही असे माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता टोला लगावला.यावेळी नगरसेवक मंदार पहाडे, शिवसेनेचे नगरसेवक हाजी मेहमुद सय्यद, यांनी चर्चेत भाग घेतला.