Breaking News

वारी विद्यालयात विद्यार्थ्यांन विना शिक्षक दिन साजरा !

वारी विद्यालयात विद्यार्थ्यांन विना शिक्षक दिन साजरा !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
     विद्यालयात विविध  उपक्रम राबवत शैक्षणिक गुणवत्तेत कोपरगाव  तालुक्यात वेगळा ठसा उमटविणारे   वारी येथिल  श्री रामेश्वर विद्यालय  येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच  विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत शिक्षक   दिन साजरा करण्यात आला. .  
    वारी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री रामेश्वर विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त बहुजनांच्या व वंचितांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या थोर शिक्षणमहर्षी महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले , कर्मवीर भाऊराव पाटील तसेच डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यात आले.
 ज्या महापुरुषांनी परिवर्तनाचे प्रामाणिक कार्य केले आहे त्यांचेच उत्सव लोकउत्सवाच्या रुपाने साजरे होतात     शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे  शिक्षणाने माणूस आत्मनिर्भर होतो शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचविणारे सर्व  थोर   शिक्षण महर्षी यांना विद्यालयात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले
 दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यालयातील विद्यार्थी शिकवण्याचे काम करत  शिक्षकांची भूमिका  पार पाडत आसतात  या दिवशी विद्यार्थ्यांच्या  चेहऱ्यावर एक वेगळे  समाधान असते माञ या वर्षी हा शिक्षक दिन विद्यार्थ्यांच्या अनउपस्थित  साजरा करीत असताना शिक्षकांना विद्यार्थ्यांची गैरहजेरी प्रकारशाने जानवली . कोरोनाची महामारी लवकरात लवकर टळो व  विद्येची ज्ञानमंदिरे लवकर उघडुन विद्यार्थ्यांनी शाळा शाळेची मैदाने फुलावी हाच आशावाद शिक्षकांनी यावेळी  व्यक्त  केला.
याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक  सुरेश सोनवणे, कैलास शेळके , तुकाराम जेठे, नारायण सुकटे , वसंत जाधव , राजू गावित , दत्तू साळुंखे ,नितीन निकम, सुरेश जमदाडे , गोरख सोनवणे सेवकवृंद उपस्थित होते.