Breaking News

कोपरगाव तालुक्यात ५३ रुग्णाची भर तर ३३ कोरोनामुक्त !

कोपरगाव तालुक्यात ५३ रुग्णाची भर तर ३३ कोरोनामुक्त
-------------
तालुक्यात आज दोन मृत्यू
----------


करंजी प्रतिनिधी-
      आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण २०१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३९ बाधित तर १६२ अहवाल निगेटीव्ह आले आहे तर खाजगी लॅब च्या अहवालात १४ कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
शहरात ३३ तर ग्रामिण २० रुग्ण आढळून आले आहे
सुभद्रा नगर-३
अन्नपूर्णा नगर-२
निवारा-५
खडकी-५
संभाजी चौक-१
टिळकनगर-४
कालेमळा-२
जुनी कचेरी-१
येवला नाका-१
कर्मवीर नगर-२
गांधी मैदान-१
समता नगर-५
सप्तर्षी मळा-१
बहादरपूर-१
कारवाडी-१
उक्कडगाव-७
पोहेगाव-२
टाकळी-२
कोळगाव थडी-४
चासनळी-३

असे आज १९ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ५३ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ३३ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १४८६ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १८२ झाली आहे.

आज रोजी कोपरगाव तालुक्यातील वारी येथील ३१ वर्षीय व उक्कडगाव येथील ४१ वर्षीय पुरुषांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे त्या मुळे आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २६ झाली आहे.