Breaking News

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती मध्ये जास्तीत जास्त पदे भरा, आमदार लंके यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे केली मागणी !

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती मध्ये जास्तीत जास्त पदे भरा, आमदार लंके यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे केली मागणी !
----


पारनेर प्रतिनिधी - 
      पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी पार्टीचे आमदार निलेश लंके यांनी गेल्या दोन अधिवेशनात महाराष्ट्रातील प्रलंबित व आवश्यक असणारे अनेक प्रश्न तारांकित करत सदर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेळोवेळी अधिवेशनात सहभाग नोंदवत प्रभावीपणे पाठपुरावा केला होता. व महाराष्ट्र पातळीवर अनेक प्रश्नांची सोडवणूकही केली आहे .
       ऑनलाइन शिक्षण हे संकल्पना अमलात आणून त्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात केला जाणार आहे.असे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते.त्यात शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर शिक्षण मंत्र्यांशी पाठपुरावा करत अनेक मागण्या महाराष्ट्र पातळीवर निर्णायक करण्यात आमदार निलेश लंके यांना यश आले आहे.
        ग्रामीण भागातील अनेक तरुण शारीरिक दृष्ट्या सक्षम असतानाही मार्गदर्शनाअभावी व शारीरिक सराव चाचणी मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेक तरुण बांधवांना पोलीस भरती सहभाग नोंदवूनही ही यश मिळत नाही. त्यामुळे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ऑनलाइन महाराष्ट्र पोलीस भरती हा उपक्रम श्री संदीप गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच सुरु होणार असून त्यासंदर्भात सर्व तयारी पूर्ण झाली आहे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये हे आजतागायत 13 ते 14 हजार तरुण विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश मिळवला आहे .
         राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर आबा यांनी त्यांच्या कार्यपदावर असताना जो निर्णय घेतला होता की शारीरिक सराव परीक्षा ही शंभर गुणांची व लेखी परीक्षा 50 गुणांची होती परंतु तदनंतर आलेल्या सरकारने त्यात बदल करत शारीरिक सक्षम असणाऱ्या तरुणांना साठी होणारी शारीरिक सराव परीक्षेला कमी गुण व लेखी परीक्षेला जास्त गुण असा पायंडा पाडला होता . त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण शारीरिक क्षमता असूनही त्यांना पोलीस भरती प्रक्रिया पासून वंचित राहावे लागत होते .परंतु आमदार निलेश लंके यांनी सोमवारी अधिवेशनात या पोलीस भरती प्रक्रियेचा मुद्दा निदर्शनास आणून देत त्या आशयाचा पत्रव्यवहार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्रव्यवहार करत अधिवेशनात हा मुद्दा उपलब्ध केला. 
           सरकार दरवर्षी पोलीस भरती प्रक्रिया राबवत असते. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील असंख्य गरीब कुटुंबातील मुले व मुली त्यासाठी अर्ज करत असतात.मागील सरकारच्या कालावधीमध्ये अतिशय तुटपुंजी पदे काढून महाराष्ट्रातील तरुण युवक व युवतीचा भ्रमनिरास झाला आहे.त्यामुळे आमदार निलेश लंके यांनी,माजी.गृहमंत्री स्वर्गीय आर.आर.पाटील यांनी जी पोलीस भरती प्रक्रिया आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवली,अगदी तशाच प्रकारची भरती प्रक्रिया पुन्हा एकदा आपल्या सरकारने राबवावी व महाराष्ट्रातील तमाम बेरोजगार मुला-मुलीना संधी उपलब्ध करून द्यावी.तसेच सदर पोलीस भरती प्रक्रिया राबवत असताना मैदानी चाचणीचे निकष देखील पूर्वी प्रमाणेच असावेत. सदर बाबीवर आपल्याकडून सकारात्मक विचार व्हावा या अशा आशयाचा पत्रव्यवहार आमदार लंके यांनी गृहमंत्र्यांकडे केला .

    महाराष्ट्राचा भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर किमान 60 टक्के समाज हा ग्रामीण भागात वास्तव्य करत असतो महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात पोलिसांचा तुटवडा असल्याकारणाने महाराष्ट्र राज्य पोलीस प्रक्रिया मध्ये ग्रामीण भागातील युवकांना संधी मिळण्यासाठी व शारीरिक चाचणीसाठी शंभर गुण लेखी साठी 50 गुण द्यावेत व अशा आशयाचे परीक्षा महाराष्ट्रात घेण्यात यावी त्यामुळे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ग्रामीण भागातील युवक हे पोलीस प्रक्रियेत सामील होऊन यशस्वी होऊ शकतात .दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा पाटील यांनी पोलीस भरती प्रक्रिया बद्दल जो आराखडा राबवला होता त्याचा पुनर्विचार करत या भरती प्रक्रियेत तो आराखडा अमलात आणावा अशा पद्धतीने राज्याचे विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख  यांची भेट घेऊन मी या आशयाचे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले .
-------
आमदार निलेश लंके