Breaking News

आमदार डॉ. लहामटें म्हणाले मला जनतेचा आशीर्वाद !

आमदार डॉ. लहामटें म्हणाले मला जनतेचा आशीर्वाद !




 अकोले /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील बोरी  आणि कोतुळ  गावाला पिण्याचा पाणीपुरवठा करणारा   बोरी लघु पाटबंधारे तलाव ओव्हर फ्लो झाल्याने  आज आमदार डॉ किरण लहामटे त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांचे  वतीने सरपंच संजय साबळे यांनीं डॉ  किरण लहामटे यांचा सत्कार  केला   यावेळीं बोलताना  डॉ किरण लहामटे म्हणाले की  कोरोना  काळात गेल्या  सहा महिन्या पासून  मी जनते बरोबर आहे या काळात माझ्या तीन कोरोना टेस्ट केल्या जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने असल्याने या तिन्ही  टेस्ट निगेटिव्ह आल्या  कोरोनामुळे चालू वर्ष बिकट आहे  प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे  या वर्षी तालुक्यात  चांगला पाऊस झाल्याने सर्व धरणे  भरले आहे  तरी धरणाचे पाणी नियोजन आवश्यक आहे  शेतकऱ्यांनी ठिबक कडे वळाले पाहिजे असे सांगत त्यांनी मुळा परिसरातील  विकास कामांचा बँकलॉग भरून काढू असे त्यांनी  या वेळी  सांगितले.
याप्रसंगी  बोरी चे सरपंच संजय साबळे  ,पोलीस पाटील दारकू कचरे,  रामदास  बांगर, गणपत कचरे ,मदन साबळे, भास्कर साबळे, नामदेव कचरे, शरद साबळे, रोहिदास पवार, भाऊसाहेब  साबळे,भानुदास शेंगाळ , सोमनाथ साबळे, चंद्रभान साबळे , दामू शेंगाळ, ,सोपान शेंगाळ, गोरख शेंगाळ,शिवाजी साबळे  अकोले पाटबंधारे विभागाचे  शाखा अभियंता ए पी  खुळे , श्री आभाळे     दादाभाऊ बांगर, सुनील बोऱ्हाडे ,किशोर  गंभीरे, कुंडलिक शेंगाळ, राजेंद्र साबळे ,बाळासाहेब साबळे, रामकृष्ण शेंगाळ, कुंडलिक कचरे, यमाजी गंभीरे, देवराम  गंभीरे, आदी सह शेतकरी ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते.
-------