Breaking News

देवळाली प्रवरा नगर पालिकेत कोरानाचा शिरकाव एक कामगार बाधीत !

देवळाली प्रवरा नगर पालिकेत कोरानाचा शिरकाव
एक कामगार बाधीत !


देवळाली प्रवरा प्रतिनिधी
               देवळाली प्रवरा नगर पालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांस कोरोना बाधीत असल्याचे तपासणीतून आढळले आहे.नगर पालिका कार्यालयात कोरोनाचा शिरकावा झाल्याने इतर कामगारांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक आरोग्य केंद्राने 23 व्यक्तींची कोरोना तपासणी करीता रँपीडस्टेस्ट घेण्यात आली.4 कोरोना बाधीत आढळले आहेत. 
                  याबाबत सविस्तर माहिती अशी की,  कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देवळाली प्रवरा नगर पालिका आपत्ती व्यवस्थापन ,  सत्यजित कदम फाऊंडेशन व स्थानिक  डॉक्टर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने कोविड सेंटर उघडण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने 23 व्यक्तींची रँपीडस्टेस्टद्वारे  तपासणी करण्यात आली यामध्ये 4 व्यक्ती कोरोना बाधीत आढळले आहे. त्यामध्ये देवळाली प्रवरातील २ व्यक्ती तर त्र्यंबकपूर व वडनेर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
                देवळाली प्रवरा नगर पालिकेतील  एक कर्मचारी कोरोना बाधीत आढळल्याने  कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या कर्मचाऱ्याचा प्रत्येक टेबलशी संबध येत असल्याने प्रत्येक कामगाराने ञास जाणवत असेल तर कोरोणाची तपासणी करुन घ्यावी असे मुख्याधिकारी  अजित निकत यांनी सांगितले.