Breaking News

अकोले तालुक्यात आज सोमवारी तब्बल ६१ कोरोना बाधित रुग्ण आढळले.!

 अकोले तालुक्यात आज सोमवारी   तब्बल ६१ कोरोना बाधित रुग्ण आढळले  ..! 

अकोले बंद वरून गटबाजी उफाळली!

अकोले/ प्रतिनिधी

अकोले तालुक्यात आज तब्बल ६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण  आढळेल असून एकूण बाधित रुग्ण संख्या ९३५ झाली आहे  .

अकोले तालुक्यात आता कोरोना  हातपाय पसरू लागला आहे   तालुक्यात  शहरा सह कोरोना आता खेड्यापाड्या डोंगरदऱ्या खोऱ्यातील वस्त्या पर्यत पोहचला आहे  अकोले शहरातील  तहसील कचेरी, पोलीस स्टेशन,,नगर पंचायत, न्यायालय , पंचायत समिती, बांधकाम विभागात कोरोनाने  शिरकाव केला आहे एके काळी सुरक्षित असणाऱ्या अकोले तालुकात  आता करोना ची काळजी वाढू लागली आहे.


 आज अकोले शहरात १३ , राजुर मध्ये १६  तर धामणगाव पाट येथे एकाच वेळी  १० कोरोना बाधित.  रुग्ण आढळले आहे


आज सोमवारी सकाळी अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात तालुक्यातील धामणगाव पाट येथील ५१ वर्षीय पुरूष, २८ वर्षीय तरुण,२६ वर्षीय तरुण,२७ वर्षीय तरुण,२५ वर्षीय महीला,४६ वर्षीय महीला,२५ वर्षीय महीला,२६ वर्षीय तरुण,२६वर्षीय तरुण,०२ वर्षीय मुलगा,बोरी येथील ४५ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महीला,व मोग्रस येथील २८ वर्षीय महीला,अकोले शहरातील शिवाजी चाैक येथील ३१ वर्षीय महीला,शहरातीलच २३ वर्षीय तरुण,पानसरवाडी येथील ५६ वर्षीय महीला,३३ वर्षीय पुरुष,०३ वर्षीय मुलगी,राजुर येथील ४५ वर्षीय महीला,२२वर्षीय तरुण अशी २० व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला 


 ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये बेलापुर येथील ४५ वर्षीय पुरूष, मन्याळे येथील ३२ वर्षीय पुरूष, ब्राम्हणवाडा येथील ४५ वर्षीय पुरूष, अशी तिन व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला.


खानापुर कोविड सेंटर येथे घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये अकोले शहरातील शाहूनगर येथील ३३ वर्षीय पुरुष,१५ वर्षीय युवक,१२ वर्षीय मुलगी,४० वर्षीय पुरूष, बस स्थानकामागील एका रुग्णालयातील २० वर्षीय तरुण,आंबेडकर नगर येथील २५ वर्षीय तरुण,महालक्ष्मी कॅालणी येथे राहणारा ३३ वर्षीय तरुण,शिवाजी चाैक येथील ५२ वर्षीय पुरूष, १८ वर्षीय तरुण,२२ वर्षीय महीला, शहरातील ५१ वर्षीय पुरूष नवलेवाडी येथील ३६ वर्षीय पुरूष, सुगाव बु येथील २५ वर्षीय तरुण,इंदोरी येथील ६८ वर्षीय पुरूष, ढोकरी येथील ४२ वर्षीय पुरूष, ०२ वर्षीय मुलगी,लहीत येथील ३५ वर्षीय पुरूष, शेरणखेल येथील ३४ वर्षीय पुरूष, वाशेरे येथील ५० वर्षीय महीला अशी १९ व्यक्ती बाधित आढळल्या


विठा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये राजुर येथील ४७ वर्षीय पुरूष,३९ वर्षीय पुरूष,१४ वर्षीय मुलगा,३५ वर्षीय पुरूष ,८६ वर्षीय पुरूष ,४५ वर्षीय पुरूष ,३८ वर्षीय पुरूष ,४५ वर्षीय महीला,५० वर्षीय महीला,४० वर्षीय महीला,३० वर्षीय महीला,२४ वर्षीय महीला,२० वर्षीय महीला,१२ वर्षीय मुलगी,गोंदुशी येथील २४ वर्षीय तरुण,पाडाळणे येथील ५३ वर्षीय महीला, २७ वर्षीय महीला,अशी १७ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला 


तसेच देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रातील ॲन्टीजन टेस्टमध्ये समशेरपुर येथील ४८ वर्षीय पुरूष ,नागाचीवाडी येथील ५२ वर्षीय पुरूष अशा  दोन जणांसह आज तालुक्यात आत्तापर्यंत एकुण ६१ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे .

कोरोना च्या वाढत्या प्रभावा मुले  राजूर      श हर बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे तर अकोले शहर बंद ठेवण्यावरून राजकीय  गटबाजी उफाळून आली आहे.अकोले बंद ठेवा  बंद ठेऊ नका या  वादावर आता तडजोडीची लस द्यावी लागणार आहे.

--